(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashok Saraf : मी मालिका कधीच करणार नव्हतो पण..., छोट्या पडद्यावर बऱ्याच वर्षांनी कमबॅक करताना अशोक सराफांची प्रतिक्रिया
Ashok Saraf : अशोक सराफ हे अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. त्यावर अशोक सराफांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Ashok Saraf on Television Comeback : महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे लवकरच कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील 'अशोक मा.मा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. तसेच मालिकेचा प्रोमोही शेअर करण्यात आला होता. या मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी अशोक सराफ हे मालिकांमध्ये कमबॅक करणार आहेत.
दरम्यान इतक्या वर्षांनीही मी मालिकेत कमबॅक करणार नव्हतो, असा खुलासा नुकताच अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत केला आहे. पण या मालिकेची कथा आवडल्याने मी ही मालिका करण्यास तयार झालो, असंही अशोक सराफांनी म्हटलं आहे. अशोक सराफ यांनी नुकतच इट्स मज्जा या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. दरम्यान आता बऱ्याच वर्षांनी अशोक सराफ यांना छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही बरेच उत्सुक आहेत. येत्या 25 नोव्हेंबरपासून दररोज रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
मी नाही असं ठरवलं होतं - अशोक सराफ
अशोक सराफ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी खरंतर मालिकेमध्ये कमबॅक करणार नव्हतो. कारण मला मालिकांमध्ये चूक वाटत नाही, पण लेखक तरी किती लिहिणार आणि कलाकार देखील त्यामध्ये किती विविध भूमिका देणार. शेवटी शेवटी मग ते धोबी काम होत जातं. म्हणून मी नाही ठरवलं होतं. आमच्यावेळी ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असायचं. त्यामुळे ते बरं होतं. शेवटी मग मला एक चांगली कथा सापडली आणि मी करण्याचा निर्णय घेतला.
मालिकेत बऱ्याच वर्षांनी कमबॅक
'अशोक मा.मा.' मालिकेबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले,"मालिका खूपच मनोरंजक आहे. चिन्मय मांडलेकरने या मालिकेची कथा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली आहे. 'टन टना टन' या मालिकेनंतर अनेक वर्षांनी पुन्हा 'कलर्स मराठी' वाहिनीच्या माध्यमातून मी टेलिव्हिजनवर कमबॅक करतोय. शूटिंग करताना खूप मजा येतेय. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्कीच आवडेल".
View this post on Instagram