Shivali Parab : शिवाली परबचं 'हार्टबीट वाढणार हाय', नव्या गाण्याची तरुणाईला भुरळ
Shivali Parab : तरुणाईचं हार्टबीट वाढवण्यासाठी शिवाली परब आणि शैलेश राठोडचं 'हार्टबीट वाढणार हाय' गाणं सज्ज झालंय.

Shivali Parab New romantic song : सध्या एकामागोमाग एक रोमँटिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सोशल मीडियावरील रीलमुळे ही गाणी ट्रेंडिंगमध्ये आलेली पाहायला मिळत आहेत. अशातच आता यंदाच्या उन्हाळयात हार्टबीट वाढवायला 'हार्टबीट वाढणार हाय' हे नवंकोरं रोमँटिक गाणं सध्या तरुणाईला भुरळ घालतंय. कॉमेडी क्विन शिवाली परब (Shivali Parab) हिचा रोमँटीक अंदाज या सिनेमात पाहायला मिळतोय.
दोन तरुण जोडप्यांमधील प्रेमळ संवाद या गाण्यातून पाहायला मिळत आहे. यावेळी रोमँटिक गाण्यासह या गाण्यात तरुणाईचं बालिश प्रेम पाहणं रंजक ठरतंय. हे हार्टबीट वाढवणारं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या गाण्याला चाहतेमंडळी भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत.
शिवाली परबचा नवा अंदाज
अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता विशाल राठोड या गाण्यात स्क्रीन शेअर करताना दिसले. 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्यात शिवाली आणि विशालचा अंदाज साऱ्यांना अधिक भावला आहे. त्यामुळे सध्या हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकू येत असल्याचं पाहायला मिळतंय. शैलेश राठोडच्या या 'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
View this post on Instagram
'हार्टबीट वाढणार हाय' या गाण्याच्या निर्मितीची धुरा शैलेश राठोडने उत्तमरीत्या निभावली आहे. या नव्या कोऱ्या गाण्याने आता एन्ट्री केली असून हे गाणं ही प्रेक्षकांसाठी सज्ज झालं आहे. या गाण्याच्या दिग्दर्शनाची बाजू अभिजीत दाणी यांनी सांभाळली आहे. तर या रोमँटिक गाण्याला सुमधुर स्वरात शैलेश राठोडने स्वरबद्ध केलं आहे. इतकंच नव्हेतर या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची आणि संवादाची धुरा शैलेशने पेलवली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब हिने आजवर तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने साऱ्यांची मनं जिंकली. आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
