Ranveer Singh Deepfake Case : रणवीर सिंह डीपफेक प्रकरण, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल; वडिलांनी केली होती तक्रार
Ranveer Singh Deepfake Case : अभिनेता रणवीर सिंह याच्या डिपफेक प्रकरणात आता सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
Ranveer Singh Deepfake Case : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा 14 एप्रिल रोजी एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी वारणासीला गेला होता. यावेळी त्याने काशी विश्वेश्वराचं देखील दर्शन घेतलं होतं. त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेननदेखील होती. पण या वाराणसी भेटीनंतर अभिनेता रणवीर सिंह चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वाराणसीमध्ये एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
त्या व्हिडिओशी छेडछाड करत डिफेकद्वारे रणवीरचा आवाज वापरून नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्यात आली होती. त्यानंतर रणवीरच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार देखील केली. त्यांच्या तक्रारीवरुन आता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरचा हा डीपफेकचा व्हिडिओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय.
रणवीरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांच्या वातावरणात रणवीरचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना देखील दिसत आहे. तसेच तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांत तक्रार केल्यानंतर रणवीर सिंहच्या टीमने बोलताना म्हटलं की, आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संबंधित सोशल मीडिया हँडलच्या विरोधात एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
या तक्रारीनंतर आता सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी देखील अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. ज्यावर कारवाई देखील करण्यात आली. पण त्यानंतरही डीपफेक व्हिडिओचं प्रमाण काही केल्या कमी होती नाहीये. त्यामुळे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कलाकारांकडून वारंवार केली जातेय.
1856
— D-Intent Data (@dintentdata) April 18, 2024
ANALYSIS: Fake
FACT: A digitally altered video of actor Ranveer Singh is being circulated, and he can be heard criticizing the BJP government. The fact is that this video has been digitally altered. In the original video, the actor can be heard speaking about (1/2) pic.twitter.com/H88VmfERSb
ही बातमी वाचा :