Kesari Veer Copy From Bahubali: तोच धबधबा, अगदी तसंच शिवलिंग अन् फाईट सीक्वेंसही सेम टू सेम; बॉलिवूडनं केली Bahubali ची कॉपी, लीड रोलमध्ये 'हे' हिरो!
Kesari Veer Copy From Bahubali: सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय, सूरज पंचोली सारखे मोठे कलाकार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे.

Kesari Veer Copy From Bahubali: 'बाहुबली' (Bahubali) आणि 'बाहुबली 2' (Bahubali 2), हे मूळ तेलुगू भाषेतले चित्रपट (Telugu Language Films) संपूर्ण भारतात खूप आवडले. दोन्ही चित्रपटांनी बक्कळ गल्ला जमवला. 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2'चे व्हिज्युअल्स, डायलॉग्स (Dialogues), वॉर एक्शन, सिनरीज, सर्वकाही डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. पण, तुम्हाला माहीत आहे का? बाहुबलीमध्ये जे काही दाखवलं गेलंय, ते सर्वकाही आता एका बॉलिवूड चित्रपटात दाखवण्यात आलंय. अगदी सेम टू सेमे, जसंच्या तसं. ज्यामध्ये सुनील शेट्टी (Suniel Shetty), विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi), सूरज पंचोली (Sooraj Pancholi) सारखे मोठे कलाकार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे.
'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' (Kesari Veer-Legends Of Somnath) असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे सेम टू सेम 'बाहुबली' सारखेच आहेत. धबधबे, शिवलिंग इत्यादींचं चित्रण अगदी बाहुबलीसारखं दिसतं. टीझरमध्ये, कलाकार योद्ध्यांची गाथा सांगताना दिसले.
'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' या आगामी पीरियड-ड्रामा चित्रपटात, सूरज पंचोली एका अज्ञात योद्धा वीर हमिरजी गोहिलची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सूरज पंचोली वीर हमिरजी गोहिलची भूमिका साकारत आहे, ज्यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिर वाचवण्यासाठी लढा दिला.
'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' च्या टीझरमध्ये सूरज पंचोली एका शक्तिशाली योद्ध्याच्या शैलीत दिसला, ज्यामध्ये अॅक्शन सीक्वेन्स, संवाद आणि वीरतेनं भरलेली दृश्य आहेत. 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' मध्ये, सूरज पंचोली त्याच्या सामान्य प्रतिमेपेक्षा वेगळा दिसला. या चित्रपटात विवेक ओबेरॉय खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच, सूरज पांचोलीसोबत सुनील शेट्टी देखील या चित्रपटात झळकणार आहे. या पीरियड ड्रामामध्ये सूरज पंचोली, विवेक ओबेरॉय, सुनील शेट्टी आणि आकांक्षा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आकांक्षा 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' हा चित्रपट 14 व्या शतकात घुसखोरांपासून ऐतिहासिक सोमनाथ मंदिराचे रक्षण करण्यासाठी लढलेल्या आणि आपले प्राण अर्पण करणाऱ्या अज्ञात योद्ध्यांची कहाणी प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सूरज पंचोलीला त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली. सिनेमातील एक अॅक्शन सीक्वेन्स शूट करताना अभिनेता जखमी झाला आणि त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. आगामी चित्रपटात अनेक जबरदस्त अॅक्शन सीन आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांमुळे तीव्र वेदना आणि जळजळ होत असतानाही, अभिनेत्यानं ब्रेक घेण्यास नकार दिला आणि संपूर्ण वेळापत्रकात शुटिंग सुरू ठेवलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केलं आहे आणि निर्मिती कानू चौहान यांनी चौहान स्टुडिओज अंतर्गत केली आहे. 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' हा चित्रपट 14 मार्च 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पाहा ट्रेलर : 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

