Chhaava Box Office Collection Day 2: आया आया आया रे तुफान... 'छावा'नं बॉक्स ऑफिस हादरवलं, दुसऱ्याच दिवशी बजेटच्या 55 टक्क्यांची कमाई
Chhaava Box Office Collection Day 2: विक्की कौशलच्या 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. यामुळेच की काय, थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर केवळ दोन दिवसांतच चित्रपटानं जोरदार मुसंडी मारली आहे.

Chhaava Box Office Collection Day 2: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी रोजी व्हेलेंटाईन डेच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत क्रेझ होती. जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, त्याचवेळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं इतिहास रचला. 'छावा' 2025 मधील सर्वात मोठा ओपनर ठरला. अशातच 'छावा'नं केवळ सर्व बॉलिवूड चित्रपटांना (Bollywood Movies) मागे सोडलं नाहीतर, अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सर्व दाक्षिणात्य चित्रपटांनाही'छावा'नं पाणी पाजलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
फिल्मनं ओपनिंग डेच्या दिवशी जोरदार कलेक्शन केल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. अशातच चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत, जाणून घेऊयात चित्रपटानं किती कमाई केली त्याबाबत सविस्तर...
'छावा' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'छावा' चित्रपटाची निर्मिती केलेल्या मॅडॉक फिल्म्सनं चित्रपटाच्या कमाईबाबत अधिकृत आकडेवारी सादर केली आहे. त्यानुसार, चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतात 33.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
View this post on Instagram
सॅकनिल्कच्या मते, आज सकाळी 10:40 वाजेपर्यंत चित्रपटाने 36.5 कोटी रुपये कमावले आहेत. यासह, चित्रपटाचं एकूण कलेक्शन 69.6 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात. पण हे स्पष्ट आहे की, चित्रपटानं त्याच्या बजेटच्या निम्म्याहून अधिक (सुमारे 55 टक्के) वसुली केली आहे.
2025 च्या 4 चित्रपटांचं लाईफटाईम कलेक्शन एकत्र केलं, तरी ते 'छावा'च्या मागेच...
या वर्षी प्रदर्शित झालेल्या चार चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शन एकत्र केलं तरी, त्यापेक्षा 'छावा'नं जास्त कमाई केली आहे. आझाद चित्रपटानं 6.35 कोटी, इमर्जन्सी 18.35 कोटी, लवयापा 6.55 कोटी आणि बॅडअस रविकुमारनं 8.2 कोटी कमावले, म्हणजेच एकूण 39.45 कोटी कमावले.
'छावा'नं अवघ्या 2 दिवसांत या सर्व चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे. देवाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, ते 33.1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतं. आणि छावानं अवघ्या काही तासांतच टोटल कलेक्शनचा आकडा पार केला.
दरम्यान, कोई मोईच्या अहवालानुसार, छावा 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. यामध्ये विक्की कौशलनं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन पडद्यावर साकारलं आहे. रश्मिका मंदानानं छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नानं औरंगजेबाची भूमिका उत्तम साकारली आहे, तर आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांनीही चित्रपटात आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.
पाहा व्हिडीओ : विक्की कौशल, रश्मिका मंदानाचा Exclusive Interview
महत्त्वाच्या इतर बातम्या :
5 Reasons To Watch Chhaava: 'छावा' का पाहावा? 'ही' 5 कारणं, म्हणून 'हा' चित्रपट पाहायलाच हवा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
