Chhaava Worldwide Box Office Collection: वर्ल्डवाईल्ड बॉक्स ऑफिसवर 'छावा'चा बोलबाला; छ्प्पडफाड कमाईनं दिग्गजांनी गुडघे टेकले, किती कोटींचा गल्ला जमवला?
Chhaava Worldwide Box Office Collection Day 12: 'छावा' प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांतच या चित्रपटानं जगभरातील कमाईचा जादुई आकडा ओलांडला आहे.

Chhaava Worldwide Box Office Collection Day 12: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) यांचा 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट यशाची शिखरं सर करत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) या ड्रामा पीरियड चित्रपटानं आपली छाप सोडली असून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कमाईच्या बाबतीत 'छावा'नं जबरदस्त कामगिरी दाखवली आहे.
त्यामुळेच, प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसांतच या चित्रपटानं जगभरातील कमाईचा जादुई आकडा ओलांडला आहे. दुसऱ्या मंगळवारी 'छावा'नं जागतिक स्तरावर किती कोटींचा व्यवसाय केला? ते सविस्तर जाणून घेऊयात...
वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये 'छावा'ची डरकाळी
अनेकदा असं दिसून आलंय की, रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यानंतर चित्रपटांच्या कलेक्शन ग्राफमध्ये घसरण सुरू होते. पण छावाच्या बाबतीत सध्या तरी असं होताना दिसत नाही. देशांतर्गत बॉक्स ऑफिस व्यतिरिक्त, विक्की कौशलचा 'छावा' चित्रपट अजूनही जगभरात दुहेरी आकड्यात कमाई करत आहे, ज्याचा अंदाज तुम्ही बाराव्या दिवशी चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनवरून सहज लावू शकता.
द बॉक्स ऑफिस इंस्टाग्राम पेजनुसार, रिलीजच्या दुसऱ्या मंगळवारी, छावानं जगभरातील कमाईच्या बाबतीत खळबळ उडवून दिली आहे आणि सुमारे 22 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'छावा'चं वर्ल्डवाईल्ड कलेक्शन आता 500 कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे.
- 'छावा'चं बजेट : 130 कोटी
- वर्ल्डवाइड कलेक्शन : 512 कोटी
- ओवरसीज कलेक्शन : 74 कोटी
दरम्यान, अकराव्या दिवसापर्यंत 'छावा'नं वर्ल्डवाईल्ड 490 कोटींची कमाई केली होती. यानुसार, बाराव्या दिवशी आता 'छावा'ची वर्ल्डवाईल्ड कमाई 512 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. अशातच, या आठवड्यातही 'छावा' धुवांधार कमाई करेल, असं बोललं जात आहे.
विक्की कौशलनं रचला रेकॉर्ड
'छावा'पूर्वी विक्की कौशलचा एकही चित्रपट जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नव्हता. अशा परिस्थितीत, अभिनेत्यानं या चित्रपटाद्वारे इतिहास रचला आहे आणि वैयक्तिकरित्या स्वतःसाठी एक मोठा विक्रम रचला. एवढंच नाही तर 'छावा' हा चित्रपट जगभरातील बॉलिवूडमधून या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. एकंदरीत, चित्रपटाच्या कामगिरीकडे पाहता असं म्हणता येईल की, येणाऱ्या काळात छावा आणखी नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसेल.
दरम्यान, 'छावा' चित्रपटात विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसून आली. तसेच, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका महाराणी येसूबाईंनी साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
