Chhaava Box Office Collection Day 12: विक्की कौशलचा 'छावा' धुवांधार, बॉक्स ऑफिसवर तुफान; 'बाहुबली 2'च्या रेकॉर्डचा चक्काचूर
Chhaava Box Office Collection Day 12: छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणारा 'छावा' लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी दिग्दर्शित केला आहे.

Chhaava Box Office Collection Day 12: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणारा 'छावा' लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी दिग्दर्शित केला आहे. 'छावा' दररोज कमाईच्या बाबतीत नवनवे विक्रम रचत आहे. अशातच दुसऱ्या मंगळवारी देखील 'छावा'नं भल्या भल्यांना पाणी पाजलं आहे. तसेच, 'छावा'नं विक्रमांचे डोंगरच्या डोंगर रचले आहेत.
दुसऱ्या मंगळवारी 'छावा'नं किती कोटी कमावले?
Sacnilk च्या अहवालानुसार, दुसऱ्या मंगळवारी चित्रपटानं 17 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या बाराव्या दिवसाच्या कमाईचे आकडे अद्याप अधिकृत नाहीत. पण जर चित्रपटानं बाराव्या दिवशी 17 कोटी रुपये कलेक्शन केलं, तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 362.25 कोटी रुपये होईल. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं मोठी कमाई केली आहे.
पहिल्या आठवड्यात 'छावा' चित्रपटानं 219.25 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आठवड्यात, शनिवारी 44 कोटी आणि रविवारी 40 कोटींची कमाई केली. सोमवारी या चित्रपटानं 18.5 कोटी रुपये कमावले होते. अशातच आज (बुधवारी) महाशिवरात्रीची सुट्टी आहे. या सुट्टीचा चित्रपटाच्या कलेक्शनला जोरदार फायदा होईल, असं सांगितलं जात आहे.
View this post on Instagram
फिल्मचा धमाकेदार रेकॉर्ड
दुसऱ्या मंगळवारच्या कमाईमध्ये फिल्मनं बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर 'पुष्पा 2' हिंदी (19.50 कोटी) आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 'छावा' (17 कोटी), तिसऱ्या क्रमांकावर बाहुबली 2 (हिंदी) 15.75 कोटी, चौथ्या क्रमांकावर जवान (14.80 कोटी) आणि पाचव्या क्रमांकावर अॅनिमल (12.37 कोटी) आहे. सनी देओलची फिल्म गदर 2 ((12.10 कोटी) ला 'छावा'नं टॉप 5 मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
'छावा'बाबत बोलायचं तर, फिल्ममध्ये विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलमध्ये आहे. अशातच रश्मिका मंदानानं त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. फिल्ममध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसून आला आहे. अभिनेता आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारख्या दिग्गजही चित्रपटात दिसून आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























