Chhaava First Weekend Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान; 72 तासांत विक्की कौशलच्याच 10 फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर, फक्त एक पिक्चर पुरून उरला
Chhaava Weekend Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'छावा'चं तुफान, फक्त 72 तासांतच विक्की कौशलच्याच 10 फिल्म्सचे रेकॉर्ड्स मोडले आहेत.

Chhaava Weekend Box Office Collection: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) प्रदर्शित होऊन फक्त 3 दिवस झालेत आणि या चित्रपटानं विक्रमांचा डोंगरच रचायला सुरुवात केलीय. कदाचित स्वतः विक्की कौशलनंही याची कल्पना केली नसेल, असे एकापेक्षा एक भारी विक्रम 'छावा'नं रचले आहेत. खरं तर, 'छावा'नं फक्त 3 दिवसांत 100 कोटींचाच टप्पा ओलांडला नाही तर, विक्की कौशलच्याच एकूण 11 चित्रपटांपैकी 10 चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्डही मोडला आहे.
'छावा'नं विक्कीच्याच 11 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला
'छावा'च्या अधिकृत दोन दिवसांच्या आकडेवारीनुसार, चित्रपटानं पहिल्या दिवशी अनुक्रमे 33.1 कोटी आणि पहिल्या दिवशी 39.30 कोटी रुपये कमावले, अशा प्रकारे दोन दिवसांत एकूण 72.40 कोटी रुपये कमावले. सॅक्निल्कच्या मते, चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 49.50 कोटी रुपये कमावून एकूण 121.9 कोटी रुपये कमावले आहेत.
यासह, या चित्रपटानं विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्व 10 चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. बॉलीवुड हंगामानं दिलेल्या वृत्तानुसार, फक्त 3 दिवसांत 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' (245.36 कोटी रुपये) वगळता इतर सर्व चित्रपटांचा विक्रम 'छावा'नं मोडला आहे.
विक्की कौशलच्या फिल्म्स | लाईफटाईम कमाई (कोटींमध्ये) |
मसान | 3.65 |
जुबान | 0.46 |
रमन राघव 2.0 | 7 |
मनमर्जियां | 27.09 |
भूत पार्ट वन- द हॉन्टेड शिप | 31.97 |
द ग्रेट इंडियन फैमिली | 5.65 |
जरा हटके जरा बचके | 88 |
सॅम बहादूर | 92.98 |
बॅड न्यूज | 66.28 |
राजी | 123.84 |
'छावा' विक्की कौशलच्या कारकिर्दीतल सर्वात मोठा चित्रपट
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, पहिल्या आठवड्याच्या शेवटी 'छावा'ची कमाई विक्की कौशलच्या कारकिर्दीतील एकूण 6 फ्लॉप चित्रपटांच्या कमाईपेक्षा जास्त झाली आहे. याशिवाय, 'छावा' विक्की कौशलच्या आजवरच्या फिल्म्सपैकी सर्वात मोठी ओपनिंग फिल्म ठरला आहे. त्यासोबतच सर्वात मोठा वीकेंड ओपनर चित्रपट बनला आहे.
फिल्म उरी- द सर्जिकल स्ट्राईकच्या लाईफटाईम कलेक्शनच्या मागे आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता 'छावा' तुफान कमाई करणार यात काही शंका नाही.
View this post on Instagram
दरम्यान, 'छावा' मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. कोई मोईनं दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट फक्त 130 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटानं आपल्या बजेटचा आकडा रिलीजच्या केवळ तीन दिवसांतच गाठला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे, तर विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ : विक्की कौशल, रश्मिका मंदानाचा Exclusive Interview
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
