एक्स्प्लोर

Chhaava Box Office Collection Day 3: हर हर महादेव... विक्की कौशलच्या'छावा'ची धुवांधार कमाई; ओपनिंग विकेंडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Chhaava Box Office Collection Day 3: विक्की कौशलच्या छावानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या फिल्मला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. अशातच 'छावा'नं ओपनिंग विकेंडलाच इतिहास रचला आहे.

Chhaava Box Office Collection Day 3: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट (Chhaava) सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. 2025 या वर्षाला दमदार सुरुवात देणाऱ्या विक्की कौशलच्या चित्रपटानं अवघ्या तीन दिवसांत प्रचंड कमाई केली आहे. ओपनिंग विकेंडला तर 'छावा'नं धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुवांधार कमाई केली. 

लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटानं फक्त आणि फक्त तीनच दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वच्या सर्व चित्रपटांना धूळ चारली आहे. खरं तर, या वर्षी आतापर्यंत कोणताही चित्रपट बंपर हिट ठरू शकलेला नाही. पण, 'छावा' रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर जणू वादळंच आलं. 'छावा'नं अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या 'स्काय फोर्स'च्या लाईफटाईम कमाईचा आकडा फक्त तीनच दिवसांत ओलांडला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony Music India (@sonymusicindia)

'छावा'ची तिसऱ्या दिवशीची कमाई केली?

'छावा' व्हॅलेंटाईन डे म्हणजेच, 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा हिस्टॉरिकल ड्रामा असलेला चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि विक्की कौशल अभिनीत 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप प्रेम मिळत आहे. यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची सुरुवात खूप चांगली झाली आणि आठवड्याच्या शेवटीही 'छावा'वर पैशांचा पाऊस पडला. जर चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर... 

  • सॅकॅनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली.
  • दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 19.35 टक्क्यांनी वाढ करून 37 कोटी रुपये कमावले.
  • आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
  • सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 49.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
  • यासह, 'छावा'ची तीन दिवसांत एकूण कमाई आता 117.50 कोटी रुपये झाली आहे.

तीन दिवसांत 'छावा'ची वर्ल्डवाईल्ड कमाई किती? 

'छावा'चं बजेट जवळपास 130 कोटीं इतकं आहे. त्यामुळे असं मानलं जात आहे की, ही फिल्म चौथ्या दिवसापर्यंत आपलं भांडवलं अगदी सहज वसूल करेल. अशातच वर्ल्डवाइड कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, 'छावा'नं दोनच दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला होता. आता फिल्मच्या कलेक्शनचे आकडे पाहिल्यानंतर असं बोललं जात आहे की, तीन दिवसांतच फिल्मनं वर्ल्डवाईल्ड जवळपास 160 कोटींचं कलेक्शन केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chhaava Movie: "संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने"; छावा चित्रपटातील एका डायलॉगने अख्खं चित्रपटगृह सुन्नं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varun Sardesai on Ashish Shelar: वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर प्रकरण तापलं, SIT चौकशीवरून राजकारण, अंधारेंचा आरोप Special Report
Prashant Padole On BJP शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर मोदी फडणवीसांना उडवून देऊ - प्रशांत पडोळे
Maharashtra Politics : महाराष्ट्राचा 'पप्पू' कोण? राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
Ashish Shelar Vs MVA मतदारयादी घोळावरुन धार्मिक राजकारण,'दुबार मतदार',ठाकरे वि. शेलार Special Report
Zero Hour Phaltan Case : फलटण डॉक्टर प्रकणावरुन अंधारेंचा एल्गार, तर राष्ट्रवादीत चाकणकर vs ठोंबरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varun Sardesai on Ashish Shelar: वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
वांद्र्यातील मुस्लीम खुपसला, मग शाह का खुपसला नाही; आडनाव बघून आशिष शेलार आक्षेप घेतात का? बोगस मतदारांवरून वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
मतदार याद्यांमधील दोष दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढे ढकला; राज्यातील अभूतपूर्व मोर्चानंतर मविआ, मनसे आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात
Kolhapur News: ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार, कारखाना चालू देणार नाही, राजू शेट्टींचा गर्भित इशारा
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Ladki Bahin Yojana :  लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा 
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Embed widget