Tumbaad : मुंज्या सावध राहा! हस्तर परत येण्याची शक्यता, सोहम शाहने दिला 'तुंबाड 2' चा सिग्नल?
Sohum Shah gives signal for Tumbbad 2 : 2008 मध्ये प्रदर्शित झालेला तुंबाड चित्रपट पुन्हा एकदा 30 ऑगस्टपासून थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
![Tumbaad : मुंज्या सावध राहा! हस्तर परत येण्याची शक्यता, सोहम शाहने दिला 'तुंबाड 2' चा सिग्नल? Tumbaad 2 Tumbaad Re relase in theatre munjya beware of hastar may return sohum shah shares photo marathi news Tumbaad : मुंज्या सावध राहा! हस्तर परत येण्याची शक्यता, सोहम शाहने दिला 'तुंबाड 2' चा सिग्नल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/b6cd1c18fc1fe9a5cf516164d9671f341724935332866322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tumbaad Re-Release : तुंबाड चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 2018 साली आलेल्या तुंबाड या पीरियड हॉरर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली. हाच चित्रपट आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तुंबाड चित्रपट 30 ऑगस्ट रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटातील अभिनेता आणि निर्माता सोहम शाह याने एक फोटो शेअर केला असून त्याचा दुसरा भागही येऊ शकतो असे संकेत दिले आहेत.
सोहम शाहने दिला 'तुंबाड 2' चा सिग्नल?
तुंबाड हा मानवी लोभ प्रवृत्तीवर आधारित चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील हस्तर राक्षसाने सर्वांनाच चकित केलं होतं. जो हस्तर भाकरीसाठी भुकेला होता आणि ज्याला विनायक राव फसवून सोन्याच्या नाणी चोरायचा. त्यानंतर 2024 साली मुंज्या आला. तर मुंज्या ज्याने मुन्नीवर प्रेम केले आणि मुन्नीशी लग्न करण्यासाठी तो कोणतीही स्तराला जाऊ शकत होता. तुंबाड आणि मुंज्याचे हे दोन राक्षस प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. या दोन्ही राक्षसांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली.
मुंज्या सावध राहा!
आता तुंबाडच्या विनायक राव म्हणजेच सोहम शाहने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतून सोहम तुंबाड 2 चे संकेत देत असल्याची चर्चा रंगली आहे. तुंबाड चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता सोहम शाहच्या सोशल मीडिया पोस्टनंतर, तुंबाड 2 तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तुंबाड चित्रपटाच्या शूटींगवेळीचा एक फोटो पोस्ट करत सोहमनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, "चिलिंग विथ हस्तर". या फोटोमुळे प्रेक्षकांना तुंबाड 2 ची उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
हस्तर परत येण्याची शक्यता
तुंबाड हा चित्रपट 30 ऑगस्टला पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सोहमने फोटो शेअर करताच तुंबाड 2 चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. सोहम तुंबड चित्रपटामधील एका फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विनायक जमिनीवर झोपलेला असून हस्तर राक्षस त्याला मागून पाहत असल्याचं दिसत आहे.
तुंबाड हा एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे. सोहम शाहच्या या फोटोमुळे तुंबाड 2 च्या चर्चांनी खळबळ उडाली आहे. फोटो पाहून हा रहस्य अनुभव पुन्हा घेण्यास चाहते सज्ज झाल्याचं दिसत आहेत. दरम्यान, कलाकार आणि चाहते तुंबाड 2 चित्रपटासाठी उत्सुक असले, तरी अद्याप या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, पण त्याच्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तुंबाडचा दुसरा भाग येणार का? आणि प्रेक्षकांना भितीदायक कथा पुन्हा पाहण्याची संधी मिळणार का? हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)