(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tamil Nadu: धक्कादायक! वडिलांनी अभ्यास करण्यासाठी घरी पाठवल्याचा राग मनात धरला अन् नऊ वर्षाच्या 'इन्स्टा क्वीन'नं मृत्यूला कवटाळलं
नऊ वर्षाच्या इन्स्टा क्विननं (Insta Queen) आत्महत्या केली आहे. या इन्स्टा क्विनला तिच्या वडिलांनी अभ्यास करण्यासाठी घरी पाठवलं होतं. त्यानंतर त्या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं.
Tamil Nadu: तामिळनाडूतील (Tamil Nadu) तिरुवल्लूर (Thiruvallur) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नऊ वर्षाच्या इन्स्टा क्विननं (Insta Queen) आत्महत्या केली आहे. या इन्स्टा क्विनला तिच्या वडिलांनी अभ्यास करण्यासाठी घरी पाठवलं होतं. त्यानंतर त्या मुलीनं (Insta Queen suicide) टोकाचं पाऊल उचललं.
'इन्स्टा क्वीन'नं मृत्यूला कवटाळलं
सोमवारी (27 मार्च) कृष्णमूर्ती (Krishnamurthy) यांनी त्यांच्या मुलीला त्यांच्या नातेवाईकांच्या घराजवळ खेळताना पाहिले. त्यानंतर कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या मुलीला घरी जाऊन अभ्यास करण्यास सांगितले. त्यांनी घराच्या चाव्या त्यांच्या मुलीला दिल्या होत्या. त्यानंतर कृष्णमूर्ती हे त्यांच्या बाईकमध्ये भरण्यासाठी गेले. रात्री 8:15 च्या सुमारास कृष्णमूर्ती हे घरी परतले. यावेळी घर आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपल्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले. पण कृष्णमूर्ती यांच्या मुलीने वडिलांचा आवाज ऐकल्यानंतर प्रतिसाद दिला नाही.
त्यानंत कृष्णमूर्ती घाबरले. त्यांनी घराची खिडकी तोडली आणि ते घरात केले गेले. घरात गेल्यानंतर त्यांनी पाहिले की, त्यांच्या मुलीनं गळ्याभोवती टॉवेल गुंडाळला होता. ती श्वास घेण्यास धडपडत होती. ती मुलगी बेशुद्ध झाली. यावेळी कृष्णमूर्ती यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेले. तिथे तिचा मृत्यू झाला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास घेत आहेत. कृष्णमूर्ती यांची मुलगी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. तिच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे ती इन्स्टा क्विन या नावानं ओळखली जात होती.
गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी अशीच एक घटना घडली होती. उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौमध्ये (Lucknow) मोबाईलवर गेम खेळण्यास आईनं नकार दिल्याने एका 10 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. लखनौच्या हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या चितवापूर भागात ही घटना घडली होती.
सोशल मीडिया स्टार्सचं देखील आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रुचिस्मिता गुरुचा (Ruchismita Guru) देखील मृत्यू झाला. रुचिस्मिता गुरूने अनेक अल्बममध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच रुचिस्मिताला गाण्याची देखील आवड होती. रुचिस्मिता गुरूने अनेक स्टेज शोमध्ये परफॉर्म केले. रुचिस्मिता गुरू ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह होती. रुचिस्मिता ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Ruchismita Guru: आकांक्षा दुबेनंतर आणखी एका अभिनेत्रीचं निधन; नातेवाईकाच्या घरात आढळला मृतदेह