महायुती सरकार शाहरुख खानला 9 कोटी परत देणार, अनावधानाने झालेल्या चुकीची भरपाई
Shah Rukh Khan Mannat : अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या जागेसाठी राज्य सरकार त्याला 9 कोटी रुपये देणार आहे.
Shah Rukh Khan Mannat Bunglow : बॉलिवूडचा 'किंग' अभिनेता शाहरुख खान याला राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये मिळू शकतात. अनावधानाने झालेल्या 'चुकीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकार शाहरुख खानला 9 कोटी रुपये देण्याची शक्यता आहेत. शाहरुख खानने 2022 मध्ये एक याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की, त्याने मुंबई उपनगर उप जिल्हाधिकारी यांना अतिरिक्त रक्कम दिली होती. अभिनेता शाहरुख खानने मुंबईतील त्याच्या मन्नत बंगल्यासाठी सरकारला अतिरिक्त रक्कम दिली होती. ही कोट्यवधींची रक्कम आता शाहरुख खानला परत मिळण्याची शक्यता आहे.
महायुती सरकार शाहरुख खानला 9 कोटी परत देणार
अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला ज्या जमिनीवर आहे, त्यासाठी सरकारने त्याच्याकडून अतिरिक्त रक्कम घेतली होती. सरकारकडून अनावधाने अतिरिक्त रक्कम घेतली गेल्याची बाब लक्षात येताच त्याने याविरोधात याचिका दाखल केली. आता लवकरच महायुती सरकार या याचिकेला मंजुरी देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत देण्याची शक्यता आहे.
अनावधानाने झालेल्या चुकीची भरपाई
शाहरुख खान आणि गौरी खान यांचा बंगला मन्नत हा वांद्रे पश्चिम येथील बँड स्टँड येथे आहे. हे आलिशान घर राज्य सरकारने मूळ मालकाला भाड्याने दिलेल्या जमिनीवर बांधलं आहे. मूळ मालकाचा करार करार मंजूर झाल्यानंतर ती जमीन त्याने शाहरुख खानला विकली.
शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत मिळणार?
2446 चौरस मीटरवर पसरलेली ही मालमत्ता शाहरुख आणि गौरी खान यांच्या नावावर नोंदणीकृत कराराद्वारे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर, शाहरुख खान आणि त्याच्या पत्नीने राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा घेत भाडेतत्त्वावरील मालमत्तेचे (वर्ग 2) पूर्ण मालकीमध्ये रूपांतर केलं. राज्य सरकारच्या धोरणानुसार, मार्च 2019 मध्ये त्यांनी रेडी रेकनर किमतीच्या 25 टक्के रक्कम देत सरकराकडून याची मालकी विकत घेतली. यासाठी त्यांनी सुमारे 27.50 कोटी रुपये रक्कम मोजली होती.
चूक शाहरुख खानला कधी लक्षात आली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानला रूपांतरण शुल्क मोजताना राज्य सरकारकडून 'अनावधानाने चूक' झाल्याचं कळलं. रेडी रेकनर किंमत म्हणजेच रूपांतरण शुल्क मोजण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या तुकड्याऐवजी बंगल्याची किंमत विचारात घेतली गेली. त्यामुळे शाहरुखने 9 कोटी रुपये अतिरिक्त शुल्क भरले. आता याचिका मंजूर झाल्यास शाहरुखने भरलेले अतिरिक्त 9 कोटी रुपये त्याला परत मिळू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :