Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा सेटवर अपघात, हॉलिवूडपटाच्या चित्रीकरणादरम्यान गळ्यावर गंभीर जखम
Priyanka Chopra Injured : एका हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान प्रियांकाचा अपघात झाला आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे.
Priyanka Chopra Injured : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्येही छाप सोडली आहे. प्रियांका चोप्रा ही लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली असली तरी हॉलिवूडपटात ती झळकत आहे. आता, एका हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान प्रियांकाचा अपघात झाला आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. प्रियांकाच्या गळ्याला जखम झाली आहे.
प्रियांका चोप्रा याआधी देखील काही चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाली होती. आता 'द ब्लफ' या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती जखमी झाली आहे. या वेळी प्रियांका गंभीर जखमी झाली आहे. प्रियांकाच्या गळ्याला जखम झाली आहे. सुदैवाने ही जखम खोलवर नव्हती. सोशल मीडियावर तिने फोटो शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्राने दाखवला फोटो...
प्रियांका चोप्रा ही सध्या ऑस्ट्रेलियात 'द ब्लफ' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. या चित्रपटात ती कार्ल अर्बनसह झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
जॉन सीनासोबत झळकणार प्रियांका
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा ही जॉन सीनासोबत 'हेड ऑफ स्टेट' या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'सिटाडेल 2' देखील आहे. चाहतेही त्याच्या बॉलिवूड चित्रपटाची वाट पाहत आहेत. ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये दिसणार होती, ज्यामध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्याही भूमिका आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत सध्या कोणतीही हालचाल नाही.