एक्स्प्लोर

OTT Movies : 'या' 8 चित्रपटांमधील थरारक शेवट आपल्याला जाग्यावरून हलू देणार नाही! ओटीटीवर कोठे पाहू शकाल?

OTT Movies : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना हादरवून टाकणारा आहे. हे चित्रपट पाहताना प्रेक्षकांना कधीच कंटाळा येत नाही. थरार, नाट्य असणारे चित्रपट पाहताना प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळते.

OTT Movies : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांचा क्लायमॅक्स खूपच जबरदस्त आणि रोमांचक आहे. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारे हे चित्रपट (Movies)आहेत. बॉलिवूडच्या या आठ चित्रपटांमधील थरारक शेवट प्रेक्षकांना जाग्यावरुन हलू देणार नाही. प्रेक्षक हे चित्रपट घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. यात बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याच्या 'फ्रेडी' (Freddy) या चित्रपटासह सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' (Detective Byomkesh Bakshy) या चित्रपटाचा समावेश आहे. 

फ्रेडी (Freddy)
कुठे पाहाल? डिज्नी प्लस हॉटस्टार 

कार्तिक आर्यन आणि अलाया फर्नीचरवाला यांच्या 'फ्रेडी' या चित्रपटातील क्लायमॅक्स खूपच खतरनाक आणि जबरदस्त आहे. हा चित्रपट प्राहताना प्रेक्षक थक्क होतील. कार्तिक आर्यन या चित्रपटात डॉक्टरच्या भूमिकेत आहे. तो अलायाच्या प्रेमात पडतो. 'फ्रेडी' हा चित्रपट प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 

टेबल नंबर 21 (Table No 21)
कुठे पाहाल? प्राईम व्हिडीओ

राजीव खंडेलवाल यांच्या 'टेबल नंबर 21' या चित्रपटातील क्लायमॅक्सदेखील जबरदस्त आहे. आदित्य दत्त दिग्दर्शित हा चित्रपट कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगवर आधारित आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. 

कहानी (Kahani) 
कुठे पाहाल? जिओ सिनेमा

बिला बालनच्या (Vidya Balan) 'कहानी' या चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या ट्विस्टची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जिओ सिनेमावर घर बसल्या कुटुंबियांसमवेश तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. 

डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी (Detective Byomkesh Bakshy)
कुठे पाहाल? प्राईम व्हिडीओ

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी' हा चित्रपट प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. या चित्रपटात सुशांत हेरगिरी करताना दिसून येत आहे. या चित्रपटातील क्लायमॅक्स जबरदस्त आहे. 

रुस्तम (Rustom)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा 'रुस्तम' हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. आता प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल. या चित्रपटातील क्लायमॅक्स पाहून प्रेक्षकांना वेड लागेल. 

ए वेडनसडे (A Wednesday)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स

'ए वेडनसडे' या चित्रपटात अनुपम खेर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात सुरुवातीपासूनच रहस्य दाखवण्यात आले आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येईल.

हसीन दिलरुबा (Haseen Dillruba)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स

तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे यांचा 'हसीन दिलरुबा' हा चित्रपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. या चित्रपटातील क्लायमॅक्स खूपच रोमांचक आहेत. 

दृश्यम (Drishyam)
कुठे पाहू शकता? डिज्नी प्लस हॉटस्टार

'दृश्यम' या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. थरार, नाट्य असणाऱ्या या चित्रपटाचा क्लायमॅक्स खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटात तब्बू आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत आहेत. एक वडिल आपल्या लेकीसाठी आणि कुटुंबासाठी काहीही करू शकतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget