एक्स्प्लोर

शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

Sharad Pawar : शरद पवार यांनी गोरगरिबांची रयत शिक्षण संस्था लुटली आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्या नावाने संस्था करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने केलाय.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम (EVM) मशीनवर आरोप केला जात आहे. तर सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी (Markadwadi) या गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मारकडवाडीत जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले असा आरोप देखील त्यांनी केलाय.   

महेश शिंदे म्हणाले की, शरद पवार यांनी गोरगरिबांची रयत शिक्षण संस्था लुटली आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्या नावाने संस्था करण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून हजार कोटी रुपये शरद पवार यांनी परस्पर मुलगी सुप्रिया सुळे यांच्या नावाने वळते केले.  त्यामुळे आता त्यांना विनंती आहे की, महाराष्ट्राने त्यांना जे मँडेट दिले आहे ते त्यांनी स्वीकारावे. आता महाराष्ट्र मुलीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सोडून द्या, असा हल्लाबोल त्यांनी शरद पवार यांच्यावर केलाय. आता महेश शिंदे यांच्या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार गट काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आता चांगलं मंत्रिपद मिळावे : महेश शिंदे 

तर, महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजून महायुतीत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक आमदार मंत्रि‍पदासाठी इच्छुक आहेत. महेश शिंदे यांना मंत्रि‍पदाबाबत विचारले असता माझ्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळ आहे. आता चांगलं मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 

मारकडवाडीतून काय म्हणाले शरद पवार? 

दरम्यान, आज शरद पवार यांनी मारकडवाडी येथे जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले की, देशात फक्त तुमच्याच गावाची चर्चा होत आहे. तुम्ही मतदान करायचा निर्णय घेतल्यावर पोलीस खात्याने तुम्हाला थांबवले. तुमच्या गावात तुम्हालाच जमावबंदी केली. हा कुठला कायदा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच तालुक्यातील सर्व गावात ठराव करा. आम्हाला ईव्हीएम मशीनवर मतदान नको, आणि आम्हाला पद्धतीने निवडणूक पाहिजे, असे ठराव करा.  या ठरावाची प्रत आम्हाला द्या. आम्ही ती प्रत निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सादर करू, असे शरद पवार यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

Maharashtra Politics: मविआचे तीन प्रमुख नेते अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी, महायुती काय करणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP MajhaSharad Pawar Full Speech : लोकांना नको असताना निवडणूक आयोगाचा EVMसाठी हट्ट का ?Jayant Patil Markadwadi Speech : उत्तम जानकरांचा राजीनाम्याचा शब्द, जयंत पाटील म्हणतात..Chandrashekhar Bawankule : अपयश लपवण्याचं काम शरद पवार करताहेत - बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Vastu Tips : 'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
Sharad Pawar : फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
फडणवीसांनी वय काढत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला, शरद पवारांचं मारकडवाडीतून चोख प्रत्युत्तर, म्हणाले, आम्हाला राजकारण...
Nandurbar :गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
गावातील दारूबंदीसाठी लाडक्या बहीणींचा पुढाकार; नंदुरबारच्या शहादा तालुक्यात थेट मतदान
cabinet expansion: एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, दोन नेते नापास; भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाची अपडेट
एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, दोन नेते नापास; भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget