एक्स्प्लोर

Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी

Bollywood Superstars : बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल करावा लागला आहे. या कलाकारांची संघर्षमय कहाणी वाचून चाहत्यांच्याही डोळ्यात पाणी येईल. मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आज हे सुपरस्टार्स बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहेत.

Bollywood 10 Superstars Struggle Story : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक कलाकारांनी स्टारकिड म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. तर दुसरीकडे काहींना मात्र स्ट्रगल चुकलेला नाही. बॉलिवूडनगरीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक कलाकार प्रचंड मेहनत घेत आहेत. मेहनतीच्या जोरावर काही यशस्वी झाले. तर काहींचा पहिलाच चित्रपट (Movie) अयस्वी झाला आणि त्यांनी रस्ता बदलला. पण काही कलाकार मात्र अपयश आल्यानंतरही निराश न होता मेहनत करतच राहिले. बॉलिवूडच्या 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. रजनीकांत (Rajinikanth) ते नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) या 10 अभिनेत्यांची स्ट्रगल स्टोरी खूपच खास आहे.

1.) नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) 

शेतकरी कुटुंबात जन्मलेला नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नवाजुद्दीन करिअरच्या सुरुवातीला एका मेडिकलमध्ये काम करत होता. पण एक दिवस त्याने 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये प्रवेश घेण्याचं ठरवलं. हाच त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. 'सरफरोश' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनेक छोटे-मोठे चित्रपट केल्यानंतर त्याला 'गँग्स ऑफ वासेपुर' हा चित्रपट मिळाला. आज खलनायकांच्या भूमिकेत नवाजुद्दीन आघाडीवर आहे.

2.) अनिल कपूर (Anil Kapoor) 

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज बॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्यांनाही टक्कर देत आहे. चेंबूरमध्ये राहणारा अनिल कपूर एकेकाळी राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये आपल्या कुटुंबासाठी राहायचा. 'वो सात दिन' या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाल्यानंतर अनिल कपूरने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

3.) बोमन ईरानी (Boman Irani) 

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बोमन ईरान काम करायचे. बोमन ईरानी हे पारसी असून आईच्या बेकरीमध्ये ते बालपणी काम करायचे. पण जाहीरातीत काम करायची एक संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. त्यानंतर बॉलिवूडचा मार्ग त्यांच्यासाठी खुला झाला.

4.) रजनीकांत (Rajinikanth) 

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हे बस कंडक्टर होते हे सर्वांनाच माहिती आहे. प्रवाशांना तिकीट देण्याची त्यांची शैली एका निर्मात्याला आवडली आणि त्याने आपल्या सिनेमासाठी रजनीकांत यांना विचारणा केली. पुढे रजनीकांत यांनी कन्नड नाटकांमध्ये काम केलं. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं.

5.) देव आनंद (Dev Anand) 

देव आनंद आज या जगात नसले तरी त्यांचं कामही आजही जिवंत आहे. सिनेसृष्टीत येण्याआधी देव आनंद क्लार्क म्हणून काम करत होते. याचे महिन्याला त्यांना 85 रुपये मिळत असे. आजही चाहते त्यांचे चित्रपट आणि काम विसरू शकत नाहीत. 

6.) सलमान खान (Salman Khan) 

सलमान खानला अभिनेता नव्हे तर दिग्दर्शक व्हायचं होतं. स्क्रिप्ट घेऊन तो अनेक ठिकाणी फिरला पण पदरी निराशाच आली. त्यानंतर त्याला 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेसाठी विचारणा झाली. या चित्रपटानंतर त्याच्या हातात काहीही काम नव्हतं. पुढे मेहनतीच्या जोरावर दबंग खानने स्वत:ला सिद्ध केलं. आज तो बॉलिवूडचा 'भाईजान' आहे. 

7.) शाहरुख खान (Shah Rukh Khan) 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यालादेखील स्ट्रगल चुकलेला नाही. शाहरुखला अभिनयाची आवड होती. पण कमी उंची, खराब नाक, वाईट आवाज, सावळा रंग अशा अनेक कारणांनी त्याला चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवला जात असे. प्रचंड गरीबीत बालपण गेलेला शाहरुख खान आज 6000 कोटींचा मालक आहे.

8.) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)

अमिताभ बच्चन यांना करिअरच्या सुरुवातीला रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. मुंबईत आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक रात्री मरीन ड्राईव्हवर घालवल्या आहेत. 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यानंतर त्यांचे 12 चित्रपट फ्लॉप झाले. पुढे 'जंजीर' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.

9.) अक्षय कुमार (Akshay Kumar)

अक्षय कुमारचं नाव आज बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. करिअरच्या सुरुवातीला खिलाडी कुमार 100 रुपयांच्या भाड्याच्या घरात राहत असे. 

10.) अरशद वारसी (Arshad Warsi) 

बॉलिवूडचा लोकप्रिय विनोदवीर अरशद वारसीची स्ट्रगल स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा कमी नाही. अरशद वारसी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी लोकल बसमध्ये नेल पॉलिश आणि लिपस्टिक विकण्याचे काम करत असे. 

संबंधित बातम्या

Mukesh Khanna : "लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
Dhule Accident : भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Accident वास्तव भाग 33 : भंगार व्यवसायिक ते ब्रम्हा बिल्डर..अगरवाल कुटुंबाचा थक्क करणारा प्रवासKolhapur : कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांचा धुमाकूळ, राजेंद्र नगर परिसरात वाहनांची तोडफोडBhagwan Pawar : मंत्र्याने दबाव आणल होता, निलंबीतअधिकाऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्रABP Majha Headlines : 05 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पत्रकाराची इज्जत काढली, आयपीएलवरुन सुरु होता वाद!
Dhule Accident : भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे धुळ्यात नागरिकांचा रोष
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
IPL Final 2024: हेडपासून स्टार्कपर्यंत, हे 10 खेळाडू ठरतील गेमचेंजर, तुम्ही व्हाल मालामाल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
कल्याणमध्ये बीएमडब्लूचे स्टिअरिंग अल्पवयीन मुलाच्या हाती, तरुणाची बोनेटवर बसून स्टंटबाजी, वडिलांविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? अधिकृत वेबसाईटची यादी एका क्लिकवर
Jalgaon News : EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे CCTV चार मिनिटांसाठी बंद, जळगाव प्रशासानाची धावपळ
EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे CCTV चार मिनिटांसाठी बंद, जळगाव प्रशासानाची धावपळ
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच 
Nashik Raid : नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर
Embed widget