एक्स्प्लोर

Eknath Shinde EVM: यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं नाहीतर.... रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला

Eknath Shinde: महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम यंत्रात घोटाळा झाल्याचा आरोप लावून धरला आहे. मविआचे नेते बॅलेट पेपर व्होटिंगची मागणी करत आहेत.

मुंबई: निवडणुकीत जेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम मशीन चांगल्या असतात. पण जेव्हा निकाल विरोधात लागतो तेव्हा मविआच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याची ओरड सुरु होते. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे आता त्यांनी ईव्हीएमचे रडगाणे न गाता विकासाचे गाणे गायला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते रविवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी मविआच्या नेत्यांवर सडकून टीका केली. झारखंडमध्ये मतदान झालं, कर्नाटकात मतदान झालं, लोकसभा निवडणुकीत मतदान झालं, प्रियांका गांधी जिंकल्या. पण जेव्हा पराभव झाला तेव्हा मविआने ईव्हीएम घोटाळा म्हणायला सुरुवात केली. दुसरं कोणी जिंकलं की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायची मागणी करायची. विरोधी पक्षाकडे आता मुद्दा राहिलेला नाही. विरोधी पक्षाला जनतेने चारीमुंड्या चीत केले आहे. जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाहीत, फिल्डवर काम करणाऱ्यांना मतदान करतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह महायुतीला लगावला.

शरद पवारांच्या आरोपांना शिंदेंचं प्रत्युत्तर

मी शरद पवारांचं वक्तव्य ऐकलं. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांची तुलना केली. काँग्रेसला जास्त मतं मिळूनही शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या, असे ते म्हणाले. पण लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये अवघ्या काही टक्क्यांचा फरक होता. तरीही मविआला 31 आणि महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 100 जागा लढवल्या होत्या. तर  शिवसेनेने 80 जागा लढवल्या होत्या. प्रत्येक मतदारसंघाचे गणित वेगळे असते. तुमचा विजय होतो, जागा जास्त, तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली. पराभव होतो, तेव्हा ईव्हीएम खराब. बाजूने निकाल लागल्यावर सुप्रीम कोर्ट चांगलं, विरोधात निकाल लागल्यावर मविआच्या नेत्याने न्यायालयावरही आक्षेप घेतला, याकडे एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगाने विकास केला आणि अनेक योजना आणल्या. त्याची पोचपावती जनता आम्हाला देईल, हे मी सांगितले होते. विधानसभा निवडणुकीत तसेच घडले. त्यामुळे आता महाविकास आघाडीने ईव्हीएमचे रडगाणे थांबवावे आणि विकासाचे गाणे गायले पाहिजे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला. नाना पटोले 200 मतांनी जिंकले, रोहित पवार 1100 मतांनी जिंकले, मग काय म्हणायचं? कोणी काही करु शकतं का? संविधान आहे, लोकशाही आहे. जनमताचे स्वागत केले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

आणखी वाचा

शरद पवार लोकशाही मानत नाहीत, निवडून आलेले त्यांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळं निवडून आलेत का? पडळकरांचा हल्लाबोल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Arrest  : प्रशांत कोरटकरला अटक, कुणाल कामराच्या गाण्यानं राजकीय घमासानMNS Gudi Padwa Melava Teaser  : मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शितKolhapur PolicePC : प्रशांत कोरटकरला कशी केली अटक? पोलिसांनी सांगितला A टू Z कहाणीJob Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget