घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Ramdas Athawale : महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत.
नाशिक : महायुतीत (Mahayuti) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 5 डिसेंबरला घेतली. यानंतर महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात खातेवाटपावरून तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत.
नाशिक येथे पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर नाशिक दौऱ्यावर आलो आहे. लोकसभेला आमचा तोटा झाला पण विधानसभेला मोठ यश मिळाले. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 14 जागांवर महायुतीने विजय मिळवला. मागील काळात युती सरकारने चांगले निर्णय घेतले, त्यात लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली. विरोधक संविधान राजकारणात आणत आहे. संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा वाद आघाडीत होता, आमच्यात कोणताच वाद नव्हता. काळाराम मंदिरात बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह आंदोलन केले होते. 2 ऑक्टोबर सत्याग्रह दिवस आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. 2 मार्च रोजी आम्ही धम्म दिवस नाशिकच्या गोल्फ मैदानावर घेण्याचे नियोजन करत आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे हे नाराज नव्हते. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. मंत्रिमंडळ विस्तारात RPI पक्षाला स्थान मिळावे. महामंडळ मिळावे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीने एकत्र लढावे. आम्ही सोबत आहोत, आम्हाला पण योग्य जागा मिळाव्या, अशा तीन मागण्या रामदास आठवले यांनी केल्या. आता देवेंद्र फडणवीस हे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मंत्रिमंडळात आमचा मंत्री असेल असे वाटते, पण खाते मागितले नाही. कारण, मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाटत नाही, अशी हताश प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
Evm खराब म्हणणाऱ्यांचं डोकं खराब
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला जात आहे. याबाबत रामदास आठवले यांना विचारले असता विरोधकांना माझं आवाहन आहे की, रडीचा डाव खेळू नका. Evm खराब म्हणणाऱ्यांचं डोकं खराब आहे. लोकशाहीचा अपमान करू नका. आम्ही काँगेसच्या काळात evm खराब असल्याचे कधी म्हणालो नाही, असा म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.
आणखी वाचा