Kartiki Gaikwad Pregnant Exclusive : कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज! प्रेग्नंसीनंतरही 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम गायिका गाण्यांचे कार्यक्रम सुरुच ठेवणार
Kartiki Gaikwad Pregnant : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'फेम (Sa Re Ga Ma Pa Little Champs) लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे. गायिकेने ओटीभरण कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
![Kartiki Gaikwad Pregnant Exclusive : कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज! प्रेग्नंसीनंतरही 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम गायिका गाण्यांचे कार्यक्रम सुरुच ठेवणार Kartiki Gaikwad Pregnant Exclusive News Sa Re Ga Ma Pa Little Champs Fame Singer Stop Singing After Pregnancy Good News Know About Fitness secret Diet tips in Marathi know details Bollywood Entertainment Latest Update Marathi News Kartiki Gaikwad Pregnant Exclusive : कार्तिकी गायकवाडने दिली गुड न्यूज! प्रेग्नंसीनंतरही 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम गायिका गाण्यांचे कार्यक्रम सुरुच ठेवणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/29/74a26f5c52b38cc4ece0902fc7cfd75c1711707575599254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kartiki Gaikwad Pregnant : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम (Sa Re Ga Ma Pa Lil Champs) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) प्रेग्नंट आहे. सोशल मीडियावर ओटीभरण कार्यक्रमातील फोटो शेअर करत कार्तिकीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. प्रेग्नंसीच्या (Kartiki Gaikwad Pregnant) घोषणेनंतर कार्तिकी आता गाण्यांचे कार्यक्रम करणं बंद करणार का? असा प्रश्न रसिकांना पडला आहे. याबद्दल एबीपी माझाशी बोलताना कार्तिकी म्हणाली की,"सध्या तरी गाण्यांचे कार्यक्रम सुरूच आहेत".
कार्तिकी गायकवाड रोनित पिसेसोबत (Ronit Pise) 10 डिसेंबर 2020 रोजी लग्नबंधनात अडकली होती. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. कार्तिकी आणि रोनितचं अरेंज मॅरेज असून साखरपुड्याचे फोटो शेअर करत कार्तिकीने 2020 मध्ये चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. लवकरच कार्तिकीच्या घरी छोट्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे.
प्रेग्नंसीदरम्यान कार्तिकी गाण्यांचे कार्यक्रम बंद करणार? (Kartiki Gaikwad Singing Show During Pregnancy)
कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या आवाजाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यामुळे आता प्रेग्नंसीदरम्यान कार्तिकी गायकवाड तिच्या गाण्यांचे कार्यक्रम बंद करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल एबीपी माझाशी बोलताना कार्तिकी म्हणाली,"प्रेग्नंसीदरम्यान अजूनतरी गाण्यांचे कार्यक्रम सुरू आहेत".
View this post on Instagram
प्रेग्नंसीदरम्यान कार्तिकीचं डाएट अन् फिटनेसकडे लक्ष (Kartiki Gaikwad Diet And Fitness)
प्रेग्नंसीदरम्यान कार्तिकी गायकवाड डाएट आणि फिटनेस या गोष्टींकडे प्रचंड लक्ष देत आहे. याबद्दल कार्तिकी म्हणाली,"सध्या डाएट आणि फिटनेस या गोष्टींकडे माझं लक्ष आहे. बाळाची तब्येत सध्या फार महत्त्वाची आहे. त्यामुळे त्या प्रकारचं डाएट डॉक्टरांनी दिलं असून ते फॉलो करण्यावर माझा भर आहे. वजन वाढण्याकडे दुर्लक्ष करतेय. घरी बनवलेल्या जेवणावर ताव मारतेय. बाहेरचे तेलकट पदार्थ खाणं सध्या टाळतेय".
कार्तिकी गायकवाडने ओटीभरण कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गायिकेवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांचे आभार मानत कार्तिकी म्हणाली,"अभिनंदन करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. आमच्या संपूर्ण कुटुंबावर सुरुवातीपासूनच रसिकांचा आशीर्वाद आहे. आता नव्या सदस्याचं आगमन होत आहे. त्याच्यावर किंवा तिच्यावरही चाहत्यांचे आशीर्वाद कायम राहुदेत".
संबंधित बातम्या
Kartiki Gaikwad Pregnancy News :'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)