Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये भारताने रचला इतिहास; 'नाटू नाटू' गाण्यासह 'The Elephant Whisperers'ने मारली बाजी
Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये भारताने इतिहास रचला आहे.
Oscars 2023 : 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) भारताने (India) इतिहास रचला आहे. तब्बल 21 वर्षानंतर 95 व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. भारतीय सिनेसृष्टीने अभिमानास्पद कामगिरी करत 'ऑस्कर 2023'मध्ये बाजी मारली आहे. भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहिटीपटाने 'ऑस्कर 2023'मध्ये सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. तर दुसरीकडे राजामौलींच्या बहुचर्चित 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉन्ग या श्रेणीमध्ये ऑस्कर पटकावला आहे.
'ऑस्कर' हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार पटकावणं हे जगातील जवळपास प्रत्येक सिनेकलाकाराचं स्वप्न असतं. अर्थात प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. मग अशा वेळी तो कलाकार किमान ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावता यावी हे दुय्यम स्वप्न पाहू लागतो. पण तरी अनेक वर्षांनंतर यंदा भारताच्या तीन सिनेमांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालं. त्यापैकी दोन सिनेमांनी बाजी मारली आहे.
'ऑस्कर 2023' भारतासाठी खास
95 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत होता. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या. भारताच्या 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म (Best Documentary Short Film) या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. तसेच आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यानं (Naatu Naatu) 'बेस्ट ओरिजनल सॉन्ग' या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे यंदा 'ऑस्कर 2023' भारतासाठी खूपच खास ठरला आहे.
'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश (Deepika Padukone On Oscars 2023)
बॉलिवूडची 'मस्तानी', 'डिंपल गर्ल' अर्थात दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) 'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत समावेश झाला होता. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील दीपिकाच्या क्लासी लुकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाने ऑस्करमध्येदेखील भारताचं नाव उंचावलं आहे.
'ऑस्कर'मध्ये दिसली भारताच्या 'नाटू-नाटू'ची धूम
'ऑस्कर'मध्ये दिसली भारताच्या 'नाटू-नाटू' या बहुचर्चित गाण्याची धूम पाहायला मिळाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात काल भैरव (Kaala Bhairava) आणि राहुल सिपलीगुंज (Rahul Sipligunj) गाणं गायलं. त्यांच्या गायनाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे. या गाण्यासाठी त्यांना 'स्टँडिंग ओव्हेशन'देखील मिळालं.
'लगान' ते मदर 'इंडिया' 'या' भारतीय सिनेमांना मिळालं ऑस्करचं नामांकन
'मदर इंडिया', 'द हाऊस दॅट आनंदा बिल्ट', 'एन एनकाउंटर विथ फेस', 'सलाम बॉम्बे', 'लगान', 'लिटिल टेररिस्ट', 'रायटिंग विथ फायर', 'द व्हाइट टायगर' या सिनेमांचा ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीत समावेश झाला आहे.
संबंधित बातम्या