(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीका
Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीका
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. दरम्यान, नागपुरातील 12 मतदारसंघातील उमरेड विधानसभा मतदारसंघातही (Umred Vidhan Sabha Election) काटेकी टक्कर झाल्याचे बघायला मिळाले. कारण या मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम तर भाजपकडून सुधीर पारवे यांच्यात थेट लढत होणार, असा अंदाज असताना भाजपचे बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे हे अचानक 'रेस' मध्ये आले. त्यामुळे येथे तिहेरी लढत रंगली. तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरेड या मतदारसंघात आजवर काँग्रेसच्या मतांचे विभाजन होत आले आहे. मात्र, यंदा भाजपचे बंडखोर प्रमोद घरडे यांनी भाजपचे सुधीर पारवे यांच्या मतांवर 'रेड' टाकली व काँग्रेसचे संजय मेश्राम 85,372 मते मिळवत विजयी झाले आहे.