एक्स्प्लोर

एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत

लोकसभा निवडणुकीत 6 महिन्यांपूर्वीच खासदार बनलेल्या काही नेत्यांची घरातील मंडळीच आता विधानसभेत आमदार बनल्याचं चित्र आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये (Election) पुन्हा एकदा घराणेशाहीचा साक्षात्कार पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे एकीकडे घराणेशाहीच्या मुद्दयावरुन नेहमीच टीका करणाऱ्या मतदारांनी, नागरिकांनीही या घराणेशाहीला पाठबळ दिल्याचं निवडणूक निकालानंतर पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश मतदारसंघात नात्यागोत्यांचा गोतावळा दिसत असून अनेकजण विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सध्या खासदार असलेल्यांची मुलेही निवडणुकीच्या रिंगणात होती, त्यामुळे वडिल खासदार आणि मुलगा आमदार अशाही अनेक जोड्या आहेत. त्यामध्ये कोकणातून राणे कुटुंबीय, मराठवाड्यात चव्हाण आणि भुमरे कुटुंबीय, ठाण्यातील शिंदे कुटुंबीय, बारामतीत (Baramati) पवार कुटुंबीय, मुंबईत गायकवाड कुटुंबीयांमध्ये एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी पाहायला मिळत आहे. त्यामुळे, निवडणूक मतमोजणीनंतर नव्या विधानसभेतल्या नातेसंबंधाचा एक विरळाच योगायोग साधला जात असल्याचे दिसून येते. 

लोकसभा निवडणुकीत 6 महिन्यांपूर्वीच खासदार बनलेल्या काही नेत्यांची घरातील मंडळीच आता विधानसभेत आमदार बनल्याचं चित्र आहे.  यंदाच्या निवडणुकांवेळी विधानसभेसाठी भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ, दोन मावसभाऊ अशा जोड्या तयार झाल्याचं पाहायला मिळालं. 

एकाच कुटुंबातील खासदार-आमदार 5 जोड्या

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले विधानसभेच्या रिंगणात होती. या दोन्ही मुलांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने ते आमदार बनले आहेत. त्यामुळे, एकाच घरात वडील खासदार आणि दोन्ही मुले आमदार आहेत.

मुंबईत मोठी बहीण खासदार तर धाकटी आमदार असा योग साधलाय. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड धारावीतून लोकसभा खासदार बनल्या आहेत. त्यानंतर, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांनी विजय मिळवत त्या आमदार बनल्या आहेत.  

नांदेडमधून वडिल राज्यसभेत आणि मुलगी विधानसभेत अशी किमया साधलीय ती माजी मुख्यमंत्री आणि खा. अशोक चव्हाण यांनी. कारण, मुलगी श्रीजया चव्हाण या निवडणुकीतून आमदार बनल्या आहेत. त्यामुळे, एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी नांदत आहे.

बारामधून पत्नी राज्यसभा सदस्य आणि पती विधानसभेत आमदार, उपमुख्यमंत्री असा योगायोग साधलाय सुनेत्रा पवार आणि दस्तुरखुद्द अजित पवार यांनी. 

भाऊबंदकी विधानसभेत

अजित पवारांनी त्यांच्या एका पुतण्याला पराभूत केलं असलं तरी त्यांचा दुसरा पुतण्या कर्जत-जामखेडमधून विधानसभा सभागृहात दाखल झाला आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आमदार बनून विधानसभेत पोहोचले आहेत. तत्पूर्वी लोकसभेत त्यांचे चिरंजीव हे तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. त्यामुळे, एकनाथ शिंदेंच्या घरात आमदारकी आणि खासदारकी आहे.  

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई दोघेही विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे, येथेही नात्यागोत्यांची घराणेशाही दिसून येते 

निवडणुकीच्या अभूतपूर्व निकालानंतर काही योगायोग होता होता राहिले आहेत. त्यामध्ये लातूरमधून दोन सख्खे भाऊ आधीच्या विधानसभेत होते, यावेळी देशमुखबंधूपैकी धीरजचा पराभव झाला आणि दोन भावांच्या दुसऱ्या जोडीला विधानसभेत जाता आलं नाही.

माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेला पराभूत झाले असले तरी त्यांची दोन्ही मुले आमदार बनली आहेत. मुलगा संतोष दानवे आणि कन्या संजना जाधव निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत दाखल होत आहेत.

हेही वाचा 

राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025Walmik Karad Supporters: कराडवर लोकांचं प्रेम, परळी थांबलीय, कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतलंAjit Pawar On Walmik Karad | दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार, मुंडेंबाबत प्रश्न अजितदादा म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Embed widget