एक्स्प्लोर

जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) निकालावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Supriya Sule : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. एकूण 230 हून अधिक जागा महायुतीला मिळाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला मोठं अपयश या निवडणुकीत मिळालं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल स्वीकरत, यातून बोध घेऊन प्रामाणिकपणे लढत राहू असं म्हटलं आहे. सुळे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. 

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो कौल दिला तो अतिशय नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करु असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण व समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू असे सुळे यांनी म्हटलं आहे. 

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ

आता जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आपल्या मूल्यांसाठी प्रांजळपणे काम करत राहू आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची ही पालखी निष्ठेने, सर्व शक्तीनिशी पुढे नेऊ असे सुळे यांनी म्गटलं आहे. या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण काम कराल ही अपेक्षा आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी, निवडणूक आयोग,निवडणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासन, प्रसारमाध्यमे, सोशल मिडिया आदी सर्वांनी सक्रिय योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव जागता ठेवून पार पाडला, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

कोणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?

महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
...............................................................
भाजपा- 132

शिवसेना (शिंदे गट)- 57

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41

काँग्रेस- 16

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10

शिवसेना (ठाकरे गट)- 20

समाजवादी पार्टी- 2

जन सुराज्य शक्ती- 2

राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1

राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1

एमआयएम- 1 जागा

सीपीआय (एम)- 1

पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1

राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 

अपक्ष- 2

महत्वाच्या बातम्या:

Sharad Pawar : महाराष्ट्राची निवडणूक का हरलो? पवारांनी सांगितले पाच मुद्दे, यूपीच्या आदित्यनाथ यांचा 'बटेंगे तो कटेंगे' चा प्रभाव मान्य केला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Survival Thriller Web Series: आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या  OTT वर करतेय ट्रेंड
आजवरची सर्वात खतरनाक वेब सीरिज, फक्त आणि फक्त खून खराबा पाहून काळजाचा चुकतो ठोका, सध्या OTT वर करतेय ट्रेंड
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सरपंचांच्या पत्नीचा CIDला महत्त्वाचा जबाब
Embed widget