एक्स्प्लोर

Actress Hina Khan Health Updates : खाणं-पिणंही झालं अशक्य! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हिना खानला आणखी एक आजार

Hina Khan Diagnosed Mucositis : हिना खानने आता आपल्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. किमोथेरेपीचे साईड इफेक्ट्स होत आहेत. त्यामुळे तिला नवा आजार जडला आहे.

Hina Khan Diagnosed Mucositis :  छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही सध्या स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. हिनावर  सध्या किमोथेरेपीचे उपचार सुरू आहेत. हिना आपल्या चाहत्यांसह उपचाराचे सगळे अपडेट्स शेअर करत असते. या दरम्यान, हिनाने आता आपल्या  प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. किमोथेरेपीचे साईड इफेक्ट्स होत आहेत. त्यामुळे तिला नवा आजार जडला आहे. 

हिना खानला झाला हा आजार....

हिना खानला तिसऱ्या पातळीवरील स्तनांचा कर्करोग झाला आहे. हिना खानने आपल्या इन्स्टा पोस्टवर केमोथेरिपीच्या साईड इफेक्टमुळे झालेल्या आजाराबाबत सांगितले आहे. केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे तिला म्युकोसायटिसचा त्रास होत असल्याचे तिने सांगितले. 

View this post on Instagram
 
A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

हिनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले की,  “केमोथेरपीचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे म्यूकोसिटिस. मात्र, त्याच्या उपचारासाठी मी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत आहे. तुमच्यापैकी कोणाला यातून गेले असेल किंवा काही उपयुक्त उपाय माहित असेल तर कृपया सुचवा. ज्यावेळी आपण काही खाऊ शकत नाही, ही बाब खूपच कठीण आहे. त्यामुळे तुम्ही दिलेल्या माहितीचा फायदा होईल असेही हिनाने म्हटले. 

माझ्यासाठी प्रार्थना करा... हिनाचे चाहत्यांना आवाहन

हिना खानने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. हिनाच्या पोस्टवर चाहत्यांनी तिला धीर देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले की, “तू लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” दुसऱ्याने लिहिले, "लवकर बरे व्हा." तुझ्यासाठी प्रार्थना करतो." एकाने कमेंटमध्ये लिहिले, " योग्य उपचार करा, एका वाईट सल्ल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते."

हिना खानने दिली हेल्थ अपडेट...

हिना खानने इन्स्टाग्रामवर एक हेल्थ अपडेट शेअर केली होती. तिने पाच केमोथेरेपी पूर्ण केल्या असून आणखी तीन इनफ्यूजन शिल्लक असल्याचे हिनाने सांगितले. काही दिवस कठीण असतात आणि काही खूपच खूपच कठीण असतात, जसा की आजचा दिवस आहे आणि मला आज खूप बरं वाटत असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. 

View this post on Instagram
 
A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

 हिना खानने आपल्या स्तनांचा कर्करोग झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. हिना खानने ही पोस्ट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक कलाकारांनी तिला धीर देत सकारात्मक विचार आणि उपचाराने बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget