एक्स्प्लोर

Alia Bhatt Birthday : वयाच्या सहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण; बॉलिवूड गाजवणारी आलिया आहे कोट्यवधींची मालकीण

आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज 30 वा वाढदिवस आहे. आलियाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि संपत्तीबद्दल...

Alia Bhatt Birthday :  प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज 30 वा वाढदिवस आहे. आलिया तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. गंगूबाई काठियावाडीमधील गंगू ते हायवेमधील वीरा, आलियाच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये झाला. आलियाचे वडील महेश भट्ट हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. तिची बहीण पूजा भट्ट देखील अभिनेत्री आहे. आलिया ही अभिनयाबरोबरच व्यावसाय देखील करते. तिची स्वत:ची एड-ए-मम्मा (Ed-e-Mamma) नावाची कपड्यांची कंपनी आहे. आज आलियाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि संपत्तीबद्दल...

आलियाचे चित्रपट

आलियाने वयाच्या सहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिने 1999 मध्ये रिलीज झालेल्या संघर्ष चित्रपटात प्रीती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तर 2012 मध्ये रिलीज झालेल्या स्टुडंट ऑफ द इयरमध्ये आलियाने प्रथमच मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. तिने डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. गंगूबाई काठियावाडीमधील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. 

आलियाची संपत्ती 

आलिया ही अभिनेत्री, बिझनेसवुमन आणि निर्माती आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, आलिया ही 557 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. एका चित्रपटात काम करण्यासाठी आलिया कोट्यवधींचं मानधन घेते. 

आलिया-रणबीरची लव्ह-स्टोरी

आलिया आणि रणबीर यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. 2013 मध्ये कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये आलियाने सांगितलं होतं की, ती वयाच्या अकराव्या वर्षी 'ब्लॅक' या चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला गेली होती. त्यावेळी रणबीर त्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यावेळी आलियाला रणबीर आवडू लागला. ब्रह्मास्त्र चित्रपटानंतर आलिया आणि रणबीरने लग्न करायचा निर्णय घेतला. 14 एप्रिल 2022 रोजी आलिया आणि रणबीरने लग्न केलं. त्यांना राहा नावाची मुलगी आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलियाच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात आलियासोबतच रणवीर सिंह देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Alia Bhatt: अशी झाली आलिया बॉलिवूडची 'डार्लिंग'; 10 वर्षांपूर्वी 'स्टुडंट' होऊन केली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Rohit Pawar : औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
Delhi High Court Judge Justice Yashwant Verma : बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Rohit Pawar : औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
औरंगजेबचा मुद्दा फ्लॉप गेला, आरएसएसनेही भाजपला वाऱ्यावर सोडलंय; रोहित पवारांचा खोचक टोला
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
CBSE म्हणजे राज्याचा SSC बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा डाव; सुप्रिया सुळेंचा संताप, शिक्षणमंत्र्यांना पत्र
Delhi High Court Judge Justice Yashwant Verma : बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
बंगल्यात आग लागताच 'नोटांचे भांडार' अग्नीशमन दलाला सापडलं! दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा आहेत तरी कोण?
Nashik News : नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
नाशिकमध्ये आदिवासी महिलेचा संशयास्पद मृत्यू, अंगावर अनेक जखमा, अपघात की घातपात?
Malegaon Blast Case : मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
मोहन भागवतांना उचलून मुंबईत आणा, परमबीर सिंह यांचा तत्कालिन एटीएस अधिकाऱ्यांना आदेश! पण, आदेश न पाळल्याने, एनआयए कोर्टात सनसनाटी दावा
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
''कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंचा निशाणा, सगळंच काढलं
Harshvardhan Sapkal Majha Maharashtra Majha Vision: औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....
औरंगजेबाप्रमाणेच हे सरकार धर्माचा वापर करून घटनांना दाबतंय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम!, म्हणाले....
Embed widget