C Ramchandra Death Anniversary: अभिनेता व्हायचं होतं झाले संगीतकार, 800 पेक्षा जास्त गाणी संगीतबद्ध; जाणून घ्या सी. रामचंद्र यांचा प्रवास...
C Ramchandra : संगीतकार रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र यांनी अनेक गाणी गायली आहेत.

C Ramchandra : संगीतकार रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (C Ramchandra) यांनी अनेक गाणी गायली आहेत. संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द कायमच झळाळती राहिली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी 120 हिंदी, सात मराठी, पाच तामिळ, तीन तेलुगु आणि एका भोजपुरी बोलपटात त्यांनी आठशेहून अधिक गाणी संगीतबद्ध केली. त्यात 35 हून अधिक गाणी त्यांनी स्वत: गायली आहेत.
संगीतदिग्दर्शक आणि पार्श्वगायक रामचंद्र नरहर चितळकर हे 'सी. रामचंद्र' या नावाने हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय होते. तसेच त्यांना 'अण्णा' असेही म्हटले जात. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीताची अतोनात आवड होती. नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले.
गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले. संगीतासह त्यांना अभिनयाचीदेखील आवड होती. 'नागानंद' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण त्यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला.
सी. रामचंद्र यांनी संगीतबद्घ केलेली काही हिंदी चित्रपटगीते अविस्मरणीय ठरली आहेत. यात जाग दर्दे इष्क जाग, जिंदगी प्यार की दो चार घडी होती है, आधा है चंद्रमा रात आधी, देख तेरे संसार की हालत, कैसे आऊँ जमुना के तीर, कितना हसीन है मौसम, गोरे गोरे ओ बांके छोरे, इना मिना डिका, कटते है दुख मे ये दिन, तुम क्या जानो, तुम्हारी याद मे, आँखो मे समा जाओ, इस दिलमें रहा करना, जलनेवाले जला करे या गाण्यांचा समावेश आहे. सी. रामचंद्र यांनी हिंदीबरोबरच काही मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर यांच्या आवाजात दिल्ली येथे 27 जानेवारी 1963 रोजी सादर केलेल्या 'ऐ मेरे वतन के लोगो' या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. हृदयस्पर्शी व प्रेरणादायी असे हे गीत आजही पूर्वीइतकेच लोकप्रिय आहे.
रामचंद्र चितळकरांना खरे तर नट व्हायचे होते. अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने सहकलाकार म्हणून स्थिरावले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दाखवली.
संबंधित बातम्या
R D Burman Death Anniversary : 'चुरा लिया है तुमने दिल को' ते 'जिंदगी के सफर में'; आर. डी बर्मन यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

