"कुतें की मौत मरोगे...", प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर गोळीबार, सलमान खानसोबत कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?
AP Dhillon House Firing : प्रसिद्ध गायक एपी ढिल्लनच्या घराबाहेर लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबार केला असून याचा सलमान खानच्या व्हिडीओशी संबंध असल्याचं बोललं जात आहे.
AP Dhillon House Firing : प्रसिद्ध गायक एपी ढिल्लनच्या घराबाहेर गोळीबार झाल्याच्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. एपी ढिल्लनच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये एपी ढिल्लन याच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी 1 ऑगस्ट रोजी घडली असून याचा सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार केलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगनेच एपीच्या घराबाहेर गोळीबार केल्याचं समोर आलं आहे.
प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर गोळीबार
रविवारी एपी ढिल्लनच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार झाला. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य रोहित गोदाराने एपी ढिल्लनच्या घरावरील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या गोळीबाराशी संबंधित एका व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ माजली असून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
एपी ढिल्लनच्या घराबाहेर गोळाबार झाल्यानं खळबळ
View this post on Instagram
सलमान खानसोबतचा व्हिडीओ आहे कारण?
लोकप्रिय इंडो-कॅनेडियन रॅपर एपी ढिल्लनच्या घरावर हल्ला तेव्हा झाला, जेव्हा त्याचा सलमान खानसोबतचा म्युझिक व्हिडीओ ट्रेंडमध्ये आलं आहे. एपी ढिल्लन याचा सलमान खानसोबतचं नवीन गाणं "ओल्ड मनी" सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओल्ड मनी म्युझिक व्हिडीओच्या यशस्वी लाँचनंतर हे गाणं इंटरनेटवर प्रचंड हिट झालं आहे. सलमानसोबतच्या या गाण्यामुळे एपी ढिल्लनला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. एपी ढिल्लनचं सलमान खानसोबतचं गाणं चर्चेत आल्यानंतर तो बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे.
एपी ढिल्लनला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
या गोळीबाराशी संबंधित सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, लॉरेन्स बिश्नोई टोळीने व्हिक्टोरिया बेट आणि वुडब्रिज, टोरंटो, कॅनडा येथे 1 सप्टेंबरच्या रात्री गोळीबार केला आहे. बिश्नोई गँगने एपी ढिल्लनला बॉलीवूड अभिनेता सलमान खानसोबतच्या त्याच्या संबंधांबद्दल इशारा देत म्हटलं आहे की, "अपनी औकात मे रहो, नही तो कुत्ते की मौत मरोगे". दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :