एक्स्प्लोर

आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?

Weather Update: फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्भूमीवर बसलेल्या हवामानानंतर तब्बल आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडीची चाहूल लागली आहे.

Weather Update: बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळानं दक्षिणेकडील राज्यांना पावसाचा तडाखा बसला. चक्राकार वारे आणि कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकत अरबी समुद्राकडे आल्याने महाराष्ट्रातही गेल्या चार दिवसांपासून पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. हिवाळ्याची चाहूल लागताच आलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानही वाढले होते. पण आता कमी दाबाचा पट्टा सैल झाला असून राज्यात पुन्हा गुलाबी थंडीला सुरुवात होणार आहे. येत्या दोन दिवसात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यात गारठा वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.

फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्भूमीवर बसलेल्या हवामानानंतर तब्बल आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडीची चाहूल लागली आहे. गुहागर मध्ये आज सकाळपासून सर्व भागात धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळत आहे. थंडीच्या पुनरागमन झाल्यामुळे बागायतदार सुखावले आहेत. फेंगल चक्रीवादळाच्या इफेक्टनंतर आज 7 डिसेंबर रोजी किमान तापमानात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाल्याचे पहायला मिळाले. नंदूरबारमध्ये आज निचांकी तापमानाची नोंद झाली असून 15.7 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. उर्वरित भागात 17 ते 23 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली. दरम्यान, काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यावर अवकाळी पावसाचे काळे ढग घोंगावतायत.

तापमानात घसरण, नंदूरबार निचांकी

राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला आहे. 9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे, तर 7 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.

अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावले

गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण होते. आज सकाळी पासून ढगाळ वातावरण मुळे गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे धान पीक  कापून ठेवलाय आणि हा कापलेला धान या पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहेत. तसेच पावसामुळे भाजीपाला, तुळ पीक यांना सुद्धा नुकसान होण्याची संभावना या पावसामुळे व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा:

Weather Update: कमी दाबाचा पट्टा विरळ, पण पावसाचा मुक्काम कायम, पुढील 3 दिवस कसे राहणार हवामान? IMDचा अंदाज वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget