Happy Birthday Vivek Oberoi : ऐश्वर्यावर प्रेम अन् सलमानसोबतचा वाद, बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्यावर विवेक ऑबेरायचं आयुष्य कसं होतं?
Vivek Oberoi Life Story : अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या करिअरची सुरुवात हिट झाली मात्र, त्याची इंडस्ट्रीतील कारकिर्द विवादित पाहायला मिळाली.
Happy Birthday Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेराय याचा आज 3 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या चॉकलेट बॉयने एकेकाळी तरुणींना वेड लावलं होतं. अभिनेता विवेक ऑबेरॉयच्या करिअरची सुरुवात हिट झाली मात्र, त्याची इंडस्ट्रीतील कारकिर्द विवादित पाहायला मिळाली. विवेक ऑबेरायला पहिल्या चित्रपटामुळेच त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. विवेक ऑबेरॉयच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्याची पर्सनल लाईफ सर्वाधिक चर्चेत राहिली. आज वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याबद्दलच्या खास गोष्टींबद्दल जाणून घ्या.
बॉलिवूडपासून दूर असूनही जगतोय लक्झरी लाईफस्टाईल
अभिनेता विवेक ऑबेराय (Vivek Oberoi) याचा जन्म 3 सप्टेंबर 1976 रोजी तेलंगणामधील हैदराबाद शहरात झाला. प्रसिद्ध अभिनेता सुरेश ऑबेराय त्याचे वडील. अभिनेता विवेक ऑबेरायने 2002 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राम गोपाल वर्मा यांच्या कंपनी चित्रपटातून त्यानं फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला. विवेक ओबेरॉयने अनेक चित्रपट केले आहेत आणि त्याचे जवळजवळ सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले. बॉलिवूडमधील करिअर संपल्यानंतर त्याने व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं. हेच कारण आहे की, बॉलिवूडपासून दूर असूनही तो लक्झरी लाईफस्टाईल जगत आहे.
बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्यावर आयुष्य कसं होतं?
अभिनेता विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीतल सांगितलं की, जेव्हा बॉलिवूडमध्ये त्याला काम मिळणं बंद झालं, तेव्हा त्याने व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. चित्रपटांमधून मिळणारी कमाई बंद झाल्यावर हेच त्याच्या उत्पन्नाचं साधन बनलं. विवेकने फार लहान वयात छोटी-मोठी काम करुन पैसे कमावण्यास सुरुवात केली. त्याने वयाच्या 16 व्या वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि स्वत:चा पोर्टफोलिओ तयार केला. त्याने परदेशात शिक्षण घेण्यासाठी पैसे जमवले. 19 व्या वर्षी त्याने बंगळुरूमध्ये व्हाईटफील्ड नावाने व्यवसाय सुरु केला आणि 21 व्या वर्षी कंपनीतील शेअर्स विकून तो शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेला.
अभिनेता होण्याआधी एक यशस्वी व्यावसायिक
परदेशात शिक्षण घेऊन परतल्यानंतर विवेक ऑबेरायने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. पण, त्याआधीच तो एक यशस्वी व्यावसायिक होता. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन फोर्स' या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय शेवटचा दिसला होता. विवेकने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. त्याने 'मस्ती' फ्रेंचाइजी, 'साथिया', 'शूटआउट ॲट लोखंडवाला' आणि 'ओंकारा' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विवेक ओबेरॉयने अभिनेता होण्यापूर्वी व्यवसाय सुरु केला होता आणि आजही तो त्याच कमाईवर अवलंबून आहे.
ऐश्वर्या रायवर जडलं प्रेम
विवेक ओबेरॉयचे वैयक्तिक आयुष्यही त्यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच चर्चेत राहिलं आहे. बॉलिवूडमधील करिअरच्या सुरुवातीच्या काळातच त्याच ऐश्वर्या रायवर प्रेम जडलं. त्यावेळी ऐश्वर्या राय सलमान खानसोबत रिलेशनमध्ये होती. पण, विवेकसोबतच्या वाढत्या जवळीकमुळे या दोघांचं नातं तुटलं. सलमान खानने विवेकला ऐश्वर्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. सलमानसोबतच्या या वादामुळे विवेकची कारकिर्द संपुष्टात आली.
सलमान खानचा विवेकला इशारा
सलमान खान सोबतचा वाद विवेक ऑबेरायने सार्वजनिक केल्यामुळे त्याच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम झाला आणि त्याच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण झाला. या वादानंतर विवेकच्या करिअरमध्ये चढ-उतार येऊ लागले. इंडस्ट्रीमधील त्याची गरज कमी होऊ लागली, त्याला अनेक मोठ्या प्रोजेक्टमधून हटवण्यात आलं. पण, विवेकने पराभव स्वीकारण्याऐवजी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरला नवी ओळख दिली. त्यासोबतच त्याने व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं. आज विवेक ऑबेरायची 29 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :