एक्स्प्लोर

Bollywood Movie Interesting Facts : एक-दोन नाही तर 'या' बॉलिवूड चित्रपटात आहेत तब्बल 71 गाणी; कोणता आहे हा चित्रपट?

Bollywood Movie Interesting Facts : बॉलिवूडमधील चित्रपटात 5-6 गाणी असणे म्हणजे सामान्य बाब आहे. मात्र, एका बॉलिवूड चित्रपटात एक, दोन, पाच नव्हे तर तब्बल 71 गाणी आहेत. या चित्रपटाच्या नावावर विक्रमाची नोंद आहे.

Bollywood Movie Interesting Facts :  भारतीय सिनेसृष्टीतील चित्रपटांमध्ये गाणी महत्त्वाची असतात. गाण्यांशिवाय चित्रपट म्हणजे काहीसे अपूर्ण वाटतात. बॉलिवूडच्या प्रत्येक चित्रपटात चार-पाच गाणी असतात. फार कमी बॉलिवूड चित्रपटात एकाही गाण्याचा समावेश नाही. हॉलिवूड चित्रपटातील गाण्याचा एक वेगळा जॉनर असतो.  बॉलिवूडमधील चित्रपटात 5-6 गाणी असणे  म्हणजे सामान्य बाब आहे. मात्र, एका बॉलिवूड चित्रपटात एक, दोन, पाच नव्हे तर तब्बल 71 गाणी आहेत. या चित्रपटाच्या नावावर विक्रमाची नोंद आहे. 

71 गाणी असलेल्या चित्रपटाचे नाव इंद्रसभा आहे. गाण्याच्याबाबतीत या चित्रपटाच्या नावावर विक्रम आहे आणि हा विक्रम कोणी मोडेल, याची शक्यताही कमीच आहे. हा चित्रपट उर्दू नाटक इंद्रसभावर आधारीत होते. अगा हसन खान यांनी पहिल्यांदा या नाटकात काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन जामाहेदजी जहांगीरजी मदन यांनी केले होते.  या चित्रपटात निसार, जहांआरा कज्जन, अब्दुल रहमान काबुली आणि मुख्तार बेगम हे मुख्य भूमिकेत होते.

या चित्रपटात शास्त्रीय आणि लोकगीते अतिशय सुरेख संगीतबद्ध करण्यात आली होती. चित्रपटात ठुमरी, गझल, गाणी, चौबोला (पाकिस्तानी काव्यपरंपरेतील ओळी, ज्या लोकगीतांमध्ये वापरल्या जातात) आणि पद्यांचा समावेश होता. या सर्व गोष्टी एकत्र ठेवल्यास चित्रपटात एकूण 71 गाणी असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटातील काही मोजक्याच गाण्याच्या प्रिंट्स सध्या उपलब्ध आहेत. 

भारतातील पहिला बोलपट असलेल्या आलम आरामध्ये 7 गाणी होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या 'इंद्रसभा' चित्रपटात 71 गाणी होती. 

गिनीज बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंद 

 इंद्रसभा चित्रपटातील 71 गाण्यांना संगीत दिग्दर्शक नागरदारप नायक यांनी स्वरबद्ध केले होते. या चित्रपटाचे नाव गिनीज बुक रेकोर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. एकाच चित्रपटात सर्वाधिक गाणी असण्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहे. 

या चित्रपटांच्या नावावरही विक्रम

1943 मध्ये प्रदर्शित झालेल्या शंकुतला या चित्रपटात 42 गाणी होती. त्यानंतर  90 च्या दशकात काही चित्रपटांमध्ये 10 ते 14 गाणी असायची.  सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके है कौन?'मध्ये 14 गाणी होती.  इम्तियाज अलीने दिग्दर्शित केलेल्या रॉकस्टार चित्रपटात 14 गाणी होती. तर, सुभाष घई यांच्या ताल चित्रपटासाठी संगीतकार ए.आर.रहमान यांनी 12 गाणी संगीतबद्ध केली होती. या चित्रपटांची गाणी सुपरहिट झाली होती. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही हिट झाली होती. 

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget