एक्स्प्लोर
Most Awaited Release In February 2025: 'बेबी जॉन', 'द मेहता बॉईज', 'धूम धाम' अन्, फेब्रुवारीत मनोरंजनाचा मसाला, कधी, कुठे पाहाल?
Most Awaited Release In February 2025: फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर धमाका होणार आहे. खरं तर, या महिन्यात अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेब सीरिज विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.
Most Awaited Release In February 2025
1/8

धूम धाम हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये यामी गौतम धर आणि प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट कोयल (यामी गौतम) ही एक मुक्त स्वभावाची स्त्री आणि वीर (प्रतीक गांधी) ही एका लाजाळू पशुवैद्याची कथा आहे, ज्याच्या लग्नाचा दिवस गोंधळलेला असतो आणि त्यातून विनोदी आणि अॅक्शननं भरलेल्या घटनांची मालिका सुरू होते. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
2/8

बडा नाम करेंगे हा शो 7 फेब्रुवारी 2025 रोजी सोनीलिव्हवर प्रदर्शित होईल. या सीरिजमध्ये हृतिक घनशानी आणि आयशा कादुस्कर मुख्य भूमिकेत आहेत.
3/8

'द मेहता बॉईज' हा बोमन इराणी यांचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट. हा चित्रपट एका वडील आणि मुलाची कहाणी आहे. या चित्रपटात बोमन इराणी आणि अविनाश तिवारी बापलेकाच्या भूमिकेत आहेत, ज्यांना त्यांच्यात मतभेद असूनही, विकेंड एकत्र घालवावा लागतो.
4/8

मेहता बॉईज 7 फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
5/8

'मिसेस' हा चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' (2021) या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत हिंदी एडेप्टेशन आहे. त्याची कथा एका नृत्यांगना रिचाची आहे, जी एका श्रीमंत डॉक्टरशी लग्न केल्यानंतर सामाजिक दबावांशी झुंजते.
6/8

हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी ZEE5 वर प्रदर्शित होईल.
7/8

वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही, पण आता तो ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट अॅटली यांनी निर्मित केला आहे आणि 2016 च्या तमिळ चित्रपट थेरीचा रिमेक आहे.
8/8

बेबी जॉनचा प्रीमियर 28 फेब्रुवारीपासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर होणार आहे. दरम्यान, याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही.
Published at : 04 Feb 2025 10:39 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























