अखेर घटस्फोट होणार? अभिषेक-निम्रतच्या अफेअरची चर्चांना उधाण, लग्नाबद्दल विचारताच अभिनेत्री म्हणाली...
Abhisheak Bachchan Nimrat Kaur Affair Rumors : अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्या अफेअरची सध्या सोशल मीडियावर चर्चां रंगली आहे. हेच घटस्फोटाचं कारण असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
![अखेर घटस्फोट होणार? अभिषेक-निम्रतच्या अफेअरची चर्चांना उधाण, लग्नाबद्दल विचारताच अभिनेत्री म्हणाली... Abhishek Bachchan nimrat kaur Dating rumors nimrat kaur spoke about marriage plans video viral Aishwarya Rai Divorce marathi news अखेर घटस्फोट होणार? अभिषेक-निम्रतच्या अफेअरची चर्चांना उधाण, लग्नाबद्दल विचारताच अभिनेत्री म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/23/ba68a1e6945a44fc88096ba21509a9801729667781650322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Abhisheak Bachchan Nimrat Kaur Relationship Rumors : बॉलिवूड कलाकारांची प्रोफेशनला लाईफसोबतच पर्सनल लाईफही खूप चर्चेत असते. अनेक असेही सेलिब्रिटी आहेत, जे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहतेही खूप उत्सुक असतात. सोशल मीडियावर सेलिब्रिटींबाबत वेगवेगळ्या चर्चाही होताना पाहायला मिळतात. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन बॉलिवूडच्या चर्चित जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या नात्याता काहीही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.
ऐश्वर्यासोबत घटस्फोटादरम्यान 'या'अभिनेत्रीशी जुळलं अभिषेकचं नाव
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्याही अनेकदा व्हायरल होतात. मात्र, आतापर्यंत दोन्ही स्टार्सने किंवा त्यांच्या कुटुंबाने याबाबत कोणतही अधिकृत माहिती दिलेली नाही आणि नकारही दिलेला नाही. त्यामुळे या चर्चा सुरुच असतात. आता ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे, हेच घटस्फोटाचं कारण असल्याचीही चर्चा आहे.
'या' अभिनेत्रीसोबत अभिषेक बच्चनच्या अफेयरची चर्चा
अभिनेता अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला प्रेमात धोका दिल्याची पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ज्यामध्ये अभिषेकचं एका अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु असल्याचा दावा करण्यात आला होता. अभिषेक बच्चन त्याची को-स्टार अभिनेत्री निम्रत कौरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन यांच्या अफेअरमुळे या कपलमध्ये दुरावा आल्याचं बोललं जात आहे.
लग्नाबद्दल विचारताच म्हणाली...
दरम्यान, ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, अभिषेक बच्चनसोबत नाव जोडलं जात असताना आता निम्रत कौरही प्रकाशझोतात आली आहे. यासोबतच निम्रत कौरचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निम्रत कौरला एका मुलाखतीत लग्नाबद्दल तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. निम्रत कौरची ही जुनी मुलाखत सध्या व्हायरल होत आहे.
निम्रत कौरने मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना सांगितलं होतं की, "लग्न ही अशी गोष्ट आहे, जी पूर्णपणे नशिबावर अवलंबून असते. जेव्हा आपण योग्य व्यक्तीला भेटता आणि जेव्हा योग्य वेळ येते, तेव्हा त्या गोष्टी त्या वेळेनुसार घडतात. या गोष्टी आधीच ठरवता येतात, असं मला वाटत नाही". इंडिया टाइम्स डॉट कॉमला 2016 मध्ये दिलेल्या मुलाखतीत निम्रत कौरने हे वक्तव्य केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचा संताप, म्हणाला, "आता बस्स झालं..."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)