VIDEO : ऐश्वर्या रायसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचा संताप, म्हणाला, "आता बस्स झालं..."
Abhishek Bachchan Video Viral : अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पापाराझींवर भडकल्याचं दिसत आहे.
Abhishek Bachchan Video : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कपलचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला धोका दिल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. अभिषेक बच्चन दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं तुटल्याचं बोललं जात आहे. यासंबंधित अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पापाराझींवर भडकताना दिसत आहे.
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनचा संताप
मीडिया रिपोर्टनुसार, दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे दोघेही एका घरात राहत नाहीत आणि कोणत्याही कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत नाही. मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नातही अभिषेक बच्चन त्याच्या कुटुंबासोबत दिसला होता, तर ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती. यानंतर अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. अभिषेक-ऐश्वर्या एकत्रही दिसत नाहीत, त्यामुळे या चर्चांनी जोर धरला आहे.
म्हणाला, "आता बस्स झालं..."
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना अभिषेक बच्चन मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. या दरम्यान, अभिषेक बच्चन भडकल्याचं दिसत आहे. विमानतळावरुन बाहेर पडताना अभिषेक बच्चन मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये दिसला. यावेळी पापाराझी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढत होते. पुढे आल्यावर तो पापाराझींना म्हणाला की, "आता बस्स झालं."
नेमकं काय घडलं?
अभिषेक बच्चन नुकताच मुंबई विमानतळावर दिसला, तिथून त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन विमानतळावरून बाहेर पडताना पापाराझींकडे दुर्लक्ष करत सरळ चालत गेला. पापाराझींसाठी पोज देण्यासाठी तो कुठेही थांबला नाही. काही पापाराझी अभिषेक बच्चनच्या मागे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी पार्किंगमध्ये गेले. यानंतर अभिषेक बच्चन पॅप्ससमोर हात जोडून म्हणाला, "आता बस्स झालं भाऊ, धन्यवाद". यादरम्यान अभिषेक थोडासा रागावलेला दिसत होता आणि अभिनेत्याचा मूड ऑफ असल्याचं दिसत होतं.
अभिषेक बच्चन भडकला, व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram