एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

16:49 PM (IST)  •  04 Jun 2022

कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) कोरोनाची लागण झाली आहे. कार्तिक हा सध्या त्याच्या भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला  आहे. 

वाचा सविस्तर बातमी 

15:44 PM (IST)  •  04 Jun 2022

Urmilla Kothare : 'कळकळीची विनंती करते...'; उर्मिला कोठारेनं शेअर केला व्हिडीओ

Urmilla Kothare : 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत मल्हारची बायको आणि स्वराच्या आईचे वैदेहीचे पात्र उर्मिला कोठारे (Urmilla Kothare) साकारत होती. आता मालिकेत स्वराच्या आईचे निधन होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकानुसार उर्मिला कोठारे मालिकेमधून एक्झिट घेणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता उर्मिलानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन या मालिकेबद्दल एक माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचा 

16:24 PM (IST)  •  04 Jun 2022

Rhea Chakraborty IIFA 2022:  परवानगी असूनही ‘आयफा 2022’साठी दुबईत पोहचू शकली नाही रिया चक्रवर्ती, जाणून घ्या नेमकं काय झालं...

Rhea Chakraborty IIFA 2022: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) अबुधाबीला जाण्याचे स्वप्न भंगले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेली रिया चक्रवर्ती 2 जून ते 5 जून या दरम्यान अबूधाबीमध्ये आयोजित ‘आयफा’ (IIFA 2022) पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार होती. कोर्टातून जामिनावर सुटलेली रिया चक्रवर्ती हिने ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स’ (NDOS) अंतर्गत परदेश प्रवासासाठी कोर्टाची परवानगीही घेतली होती. पण, तरीही ती अबुधाबीला जाऊ शकली नाही.

ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने रिया चक्रवर्तीवर 2020पासून परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रियाने आयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी कोर्टात अर्ज करून परवानगी मागितली होती. अभिनेत्रीने पासपोर्ट परत मिळवण्यासाठी आणि परदेशात जाण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तिला काही अटी शर्थींसह परवानगी दिली होती. पण, रिया चक्रवर्ती विरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आल्याने तिला परदेशात जाता आलेले नाही. परदेश प्रवासासाठी अर्ज दाखल करताना, रिया चक्रवर्तीच्या विरोधात एजन्सीने जारी केलेल्या लुकआउट नोटीसबद्दल तिला माहिती नव्हती.

वाचा सविस्तर बातमी 

12:33 PM (IST)  •  04 Jun 2022

‘तू सुपरस्टार आहेस’, हृतिक रोशनने केलं ‘एक्स-वाईफ’ सुझान खानचं कौतुक!

Sussanne Khan, Hrithik Roshan : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझान खान (Sussanne Khan) ही जोडी घटस्फोट घेऊन वेगळी झाली असली, तरी त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. मुलं हृहान आणि ह्रदान यांच्या सहपालकत्वापासून ते कुटुंबातील कोणत्याही उत्सवापर्यंत, हे जोडी आजही एकत्र दिसते. नुकताच हृतिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारणही तसं खास आहे.

नुकताच हृतिक एका कार्यक्रमादरम्यान सुझान खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत फोटो पोज देताना दिसला होता. यानंतर त्याने सुझानच्या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. त्याने तिला ‘सुपरस्टार’ म्हटले आहे.

वाचा संपूर्ण बातमी

09:57 AM (IST)  •  04 Jun 2022

शाहरुखनं केली कॉपी?

प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या  शाहरुख खानने  (Shah Rukh Khan) शुक्रवारी (3 एप्रिल)  'जवान' (Jawan) या त्याच्या आगामी चित्रपटचा टीझर रिलीज केला. सोशल मीडियवर हा टीझर शेअर करुन करताना शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “2023 असणार अॅक्शन पॅक! 2 जून 2023 रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी 'जवान' चित्रपट रिलीज होतो.' एक मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये , शाहरुख त्याच्या डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेला, हातात मशीन गन धरुन एका गुप्त ठिकाणी बसलेला दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून त्याचे चाहते थक्क झाले. 

वाचा सविस्तर बातमी 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ShivJayanti 2025:सईबाईंचं बालपण जपलेला वाडा;थेट शिवरायांच्या सासरवाडीतून Phaltan Naik Nimbalkar WadaShiv Jayanti 2025 : राणू आक्कांचा वाडा...जिथं नांदली छत्रपतींची कन्या Ranu Akka Wada Satara BhuinjRekha Gupta Delhi New CM : रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधीUddhav Thackeray on Operation Tiger : उद्धव ठाकरे यांची 'ती' रणनीती ऑपरेशन टायगर मोडून काढणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
'बॉस'चा ट्रॅप, संशयाचा रॅप; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत संतोष देशमुख, महादेव मुंडेंना न्याय मिळणार का? 
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.