Rhea Chakraborty IIFA 2022: परवानगी असूनही ‘आयफा 2022’साठी दुबईत पोहचू शकली नाही रिया चक्रवर्ती, जाणून घ्या नेमकं काय झालं...
Rhea Chakraborty IIFA 2022: ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला कोर्टाने जामिनावर सोडले होते. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने तिला 2020पासून परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Rhea Chakraborty IIFA 2022: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे (Rhea Chakraborty) अबुधाबीला जाण्याचे स्वप्न भंगले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेली रिया चक्रवर्ती 2 जून ते 5 जून या दरम्यान अबूधाबीमध्ये आयोजित ‘आयफा’ (IIFA 2022) पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार होती. कोर्टातून जामिनावर सुटलेली रिया चक्रवर्ती हिने ‘नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स’ (NDOS) अंतर्गत परदेश प्रवासासाठी कोर्टाची परवानगीही घेतली होती. पण, तरीही ती अबुधाबीला जाऊ शकली नाही.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने रिया चक्रवर्तीवर 2020पासून परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रियाने आयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी कोर्टात अर्ज करून परवानगी मागितली होती. अभिनेत्रीने पासपोर्ट परत मिळवण्यासाठी आणि परदेशात जाण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तिला काही अटी शर्थींसह परवानगी दिली होती. पण, रिया चक्रवर्ती विरुद्ध लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आल्याने तिला परदेशात जाता आलेले नाही. परदेश प्रवासासाठी अर्ज दाखल करताना, रिया चक्रवर्तीच्या विरोधात एजन्सीने जारी केलेल्या लुकआउट नोटीसबद्दल तिला माहिती नव्हती.
लुकआऊट नोटीसबाबत कल्पना नव्हती!
ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला कोर्टाने जामिनावर सोडले होते. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असल्याने तिला 2020पासून परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ती आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खूप उत्साहित होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज करून अबुधाबीला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, तिला लुकआऊट नोटीसबाबत कोणतीही माहिती नव्हती. अशा परिस्थितीत ती परवानगी मिळूनही देश सोडून कुठेही जाऊ शकली नाही.
'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' (IIFA) सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता. पण यंदा मात्र हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा अबूधाबीच्या यास बेटावर होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. या पुरस्कार सोहळ्यात शाहिद कपूर, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, सारा अली खान, अनन्या पांडे, दिव्या खोसला कुमार आणि नोरा फतेही असे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. तर दुसरीकडे तनिष्क बागची, गुरु रंधावा, हनी सिंह, नेहा कक्कड, ध्वनी भानुशाली, झाहरा एस खान आणि असीस कौर या कलाकारांच्या संगीताची जादू प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary : ‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही कोरले नाव! वाचा एस. पी. बालासुब्रमण्यमबद्दल...
- Samrat Prithviraj : 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन