Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसैनिकाची बोटं छाटली, उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावून म्हणाले, बदला घेणारच!
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंगोलीतील सभेत साथ सोडून गेलेले आमदार संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली.
Uddhav Thackeray, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आज (दि.9) ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. विरोधात पोस्ट टाकली म्हणून एका शिवसैनिकांची बोटं छाटण्यात आली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकाला स्टेजवर बोलावत मी याचा बदला घेणार, असंही म्हणाले. यावरुन ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सवाल केले आहेत.
तू काळजी करु नको, याचा बदला मी घेणार
जखमी कार्यकर्त्याला पुढे घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आलेत ना, माझ्या कार्यकर्त्याला घेऊन जा. त्यांना सांगा बटेंगे तो कटेंगे. त्याचा गुन्हा काय आहे? शिवसेनेचे काम करतोय. तुमच्या विरोधात पोस्ट टाकली. मी उघडपणे बोलतो. तू काळजी करु नको. याचा बदला मी घेणार आहे. लोहा शहरामध्ये एकनाथ पवार यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
महिलांवर अत्याचार होत आहेत, पिकाला भाव मिळत नाही
शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही जखम महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. सरकार आल्यावर शिवाजी महाराजांचा मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार आहे. हार घालून घेण्यासाठी महाराज जन्मला आले नव्हते. महिलांवर अत्याचार होत आहेत, पिकाला भाव मिळत नाही. जय श्रीराम प्रमाणे आज पासून जय शिवराय असं म्हणायचं. आमच्या गीतातून निवडणूक आयोगाने शिवाजी महाराजांचं नाव वागलायच सांगितलं. मुनगंटीवार यांनी नुसती वाघ नखे घेतली, त्या नखला अर्थ नाही त्या मागे वाघ लागतो. मुंबई अदनीच्या घशात घातली, उद्या अख्खा महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतील. सरकार आल्यावर अदाणीच्या घशातून काढून सर्वासाठी स्वस्त घरे उपलब्ध करून देईल.
मी बाळासाहेबांचा विचार नाही, तर भाजपला सोडलं आहे
कसलं दारोदारी फिरत आहे. सोयाबीन, कापूस पिकवणारा शेतकरी आहे. यांची धोरणं काल पर्वापासून सुरु झाली आहेत. मोदी बाबा आणि त्यांचे मुन्नाभाई आणि सर्किट येत आहेत. दोघेजण फिरत आहेत. येऊन जाऊन काय सांगतात, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मी यांना लाथ घातली. मी बाळासाहेबांचा विचार नाही, तर भाजपला सोडलं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या