एक्स्प्लोर

Bunty Shelke : संघाच्या इशाऱ्यावरच नाना पटोलेंचे काम; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा घाणघात, पक्षातून बडतर्फ करण्याचीही मागणी

Bunty Shelke : नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर काम करतात. ते संघाचे एजंट आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करा अशी मागणी काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी केलीय.

Bunty Shelke नागपूर : माझे नेते राहुल गांधीजी म्हणतात "घाबरू नका",  तुमचे सरकार किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी काही चुकीचे केले तरी उघड विरोध करा. मी माझ्या नेत्याने दिलेल्या आदेशाचे आणि माझ्या लोकशाही अधिकारांचे पालन करत आहे. संघ मुख्यालयासमोर द्वेषाची भावना असलेल्या संघाची खाकी चड्डी आणि काळ्या टोप्या हा गणवेश मी जाळू शकतो, तर काँग्रेस पक्षाच्या सन्मानासाठी नाना पटोले यांच्यासारख्या संघाच्या दलालांचाही मी तीव्र निषेध करू शकतो. असा घणाघात करत काँग्रेसचे तरुण आणि तडफदार नेते बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. 

नाना पटोले हे संघाचे एजंट- बंटी शेळके

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. ते संघाचे एजंट म्हणून काम करतात त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करून त्याच संघटनेत पाठवावे, अशी आक्रमक भूमिका घेत मध्य नागपुरातील काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी आता थेट  प्रदेशाध्यक्षा विरोधात दंड थोपटत आपल्या परभवाचे खापर फोडले आहे. गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतरही बंटी शेळके यांनी मतदारसंघ सोडला नाही. त्यांनी यंदा उमेदवारी खेचून आणत पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली. निकालानंतर पाच दिवसांनी शेळके यांनी थेट मुंबईतच पटोले यांच्यावर शरसंधान केले. गेल्या निवडणुकीत चार हजार मतांनी पराभूत झालो. त्या निवडणुकीतही पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना माझे काम न करण्याबाबत सूचना केल्या होत्या. नाना पटोले यांनी या निवडणुकीत पॅनलमध्ये नाव पाठवले नव्हते. बहुतांश ब्लॉक अध्यक्ष माझ्या बाजूने नव्हते. दोन महिला अध्यक्ष माझ्याविरोधात नियुक्त केल्या. मध्यतील कुणालाही पद हवे असल्यास माझा विरोध करावा, अशी त्यांची भूमिका राहिली, असा घणाघाती आरोप ही  शेळके यांनी केला.

तो संघटनेतला विषय आहे, त्यावर औषध नंतर करू- नाना पटोले

दरम्यान, बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले असताना दुसरीकडे नाना पटोले यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले आहे.  बंटी शेळके यांनी केलेल्या आरोपावर मी नंतर बोलले, तो संघटनेतला विषय आहे, त्यावर औषध नंतर करू. मी लोकशाही वाचवण्यासाठी काम करत आहे. त्याचे गांभीर्य मला आहे, लोकशाही वाचेल तर देश वाचेल. झारखंडमध्ये मते वाढली, पण फक्त दीड टक्का होते, पण महाराष्ट्रमध्ये 7.6 टक्के मतदान वाढले, एवढी लाईन कुठे लागली, बूथ कॅपचरिंग निवडणूक आयोग करत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे म्हणत नाना पटोलेंनी अधिक बोलणे टाळले आहे. 

बंटी शेळके हा लढवय्या नेता आहे- विजय वडेट्टीवार

बंटी शेळके काय बोलले हे मला माहीत नाही, त्यांचा उद्रेक का झाला, ही भाषा ते का वापरात आहे. हे हायकमांडच्या कानावर घालू, उद्वेगाची करणे शोधले पाहिजे. त्यांना ठेच लागली, याची माहिती घेतली जाईल. जय पराजय होत असतो, संयम महत्वाचा असतो, 16 चे 160 कसे होतील, बंटी शेळके हा लढवय्या आहे, निवडणुकीत मदत कमी पडल्याने त्यांनी राग व्यक्त केला असावा असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सManoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणीVidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Embed widget