एक्स्प्लोर

Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?

Beed news: वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याची तुरुंगातून सुटका आता अवघड मानली जात आहे.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावर विशेष तपास पथकाने (SIT) मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल केला होता. बीड जिल्ह्यातील 'बाहुबली' अशी ओळख असणाऱ्या वाल्मिक कराड याच्यासाठी हा मोठा झटका ठरला होता. या पार्श्वभूमीवर आज वाल्मिक कराड यांच्या जगमित्र कार्यालयातच त्याच्या समर्थकांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा निश्चित केली जाणार आहे. 

तर दुसरीकडे काल अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर परळीकडे रवाना झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी पहाटे परळीत दाखल झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी परळीतील वातावरण आणखी चिघळू नये, यासाठी धनंजय मुंडे यांना तातडीने मतदारसंघात धाडल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांना भेटून त्यांची समजूत काढणार का, हे बघावे लागेल.

दरम्यान, वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा एकदा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. याठिकाणी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याचा ताबा घेतला जाऊ शकतो. सीआयडीकडून देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी वाल्मिक कराड यांच्या पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते. त्यामुळे वाल्मिक कराड इतक्यात तुरुंगातून बाहेर पडण्याच्या शक्यता जवळपास मावळल्या आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे आज परळीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असती तरी जामीन मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला खूप यातायात करावी लागेल. कारण आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. एखाद्या गुन्हेगारावर मकोका लागतो, तेव्हा बहुतांश काळ हा न्यायालय आणि कोठडी यामध्ये जातो.  संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे . या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे. 

परळीत तणावपूर्ण शांतता

वाल्मिक कराड यांना मकोका लागल्यानंतर परळीतील वातावरण प्रचंड तापले आहे. वाल्मिक कराड याला मंगळवारी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यामुळे त्याचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला, असे समर्थकांना वाटले. परंतु, काहीवेळातच एसआयटीने वाल्मिक कराडला मकोका लावल्याची बातमी येताच त्यांच्या आनंदावर विरजण पडले होते. यानंतर कराड समर्थकांनी परळीत आक्रमक निदर्शन केली होती. यावेळी रस्त्यावर टायर जाळण्यात आले होते, तसेच शहरातील दुकाने बंद करण्यात आली होती. वाल्मिक कराडच्या एका समर्थकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी परळीत अद्याप तणावपूर्ण शांतता आहे.

आणखी वाचा

चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं...; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं मोठं विधान

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed Railway: बीड-पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबरपासून धावणार, बीड ते मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरु होणार; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सुनेत्रा पवारांच्या सूचना
बीड-पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबरपासून धावणार, बीड ते मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरु होणार; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सुनेत्रा पवारांच्या सूचना
विलास घुले मृत्यू प्रकरण! साक्षीदार उमेश मानेवर विवाहित महिलेचे गंभीर आरोप, पोलिसांकडून अटक, चौकशी सुरु 
विलास घुले मृत्यू प्रकरण! साक्षीदार उमेश मानेवर विवाहित महिलेचे गंभीर आरोप, पोलिसांकडून अटक, चौकशी सुरु 
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
Bajrang Sonwane Letter to Devendra Fadnavis: मराठा समाजाची अस्वस्थता वाढतेय, जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्या; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मराठा समाजाची अस्वस्थता वाढतेय, जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्या; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget