एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एका दिवसात 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? वाढीव मतदानाचे पुरावे द्या, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडूक आयोगाला पत्र लिहलं आहे.

Nana Patole : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळं जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील 7.83 टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदारसंघावर संध्याकाळी 5 नंतर  मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या? याचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे निवडणूक आयोगाने जाहीर करावेत, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीत 1.03 टक्क्यांची तफावत कुठून आली?

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 20 नोव्हेबर रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी 66.5 टक्के होती असे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने स्वत: अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आकडेवारीत 1.03 टक्क्यांची तफावत कुठून आली? असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे. 

एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली?

एका दिवसात तब्बल 9 लाख 99 हजार 359 मतांची वाढ कशी झाली? असा सवाल देखील नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे. मतांच्या टक्केवारीतील तफावत पाहता हा प्रकार गंभीर व चिंताजनक वाटत आहे. मतांच्या या वाढीबद्दल जनतेच्या मनातच शंका उपस्थित होत असतील तर त्या दूर करणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन आपली भूमिका पुराव्यासह स्पष्ट करावी आणि जनतेच्या मनातील शंकांचे समाधानकारक उत्तर द्यावे, असे या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मतांमध्ये अशी अचानक वाढ होणे संशयास्पद असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये निष्पक्ष आणि पारदर्शकपणे निवडुका पार पाडणे हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य असते. मतांच्या वाढीबद्दल जर जनतेच्या मनात शंका उपस्थित होत असतील तर ते निवडणूक आयोगाच्या विश्वासर्हतेला तडा देणारे असल्याचे मन नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगानं पुराव्यासहित जनतेच्या मनातील शंकांचं निरसण करावं असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता पटोलेंच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Shahajibapu Patil : गुवाहाटीत नव्हे, आता सांगोल्यातही काय झाडी, काय डोंगार!ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 PmABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 29 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
एआर रहमान, सायरा बानो 29 वर्षांच्या सुखी संसाराचा काडीमोडी; मुलांची कस्टडी कुणाकडे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Embed widget