एक्स्प्लोर

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

अहवालानुसार, या एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपये आहेत, परंतु या रकमेचा नेमका हिशोब सादर करण्यात अपयश आल्याने पोलिसांना संशय आला आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलीस व भरारी पथकांकडून कारवाई केली जात आहे. त्यामध्ये, आदर्श आचारसंहिता लागल्यापासून कोट्यवधी रुपये आणि मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका एटीएम मशिनसाठी नेण्यात येणारी कारही पोलिसांनी जप्त केली होती. रात्री उशिरा ही कार एटीएम मशिनमध्ये पैस भरण्यास आल्याने पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर, आता नालासोपारा (Mumbai) विधानसभेत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. साडेतीन कोटी रुपये असणारी एटीएम रक्कम घेऊन जाणारी व्हॅन स्थानिक भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे. सदर व्हॅन नालासोपारा पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून, या रकमेचा हिशोब मिळत नसल्यामुळे पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत.

अहवालानुसार, या एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपये आहेत, परंतु या रकमेचा नेमका हिशोब सादर करण्यात अपयश आल्याने पोलिसांना संशय आला आहे. त्यावरून पोलिस आता तपास करत आहेत की ही रक्कम एटीएमसाठी होती, की निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार होती. सदर प्रकरणावर पुढील तपास सुरू असून, व्हॅनमधील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली जात आहे. पोलिसांनी व्हॅनमधील बॅगांमध्ये असलेली रक्कम जप्त केली आहे. तर विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कोटी 80 लाख एवढी रोख रक्कम कॅश व्हॅनमध्ये सापडली आहे. निवडणूकांच्या आचारसंहितेचा कॅश संदर्भात असलेली नियमावली पाळत नसल्याने, पोलिसांनी कॅश व्हॅन ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

संभाजीनगरमध्येही 40 लाख जप्त

दरम्यान, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातही पोलिसांनी 40 लाख रुपयांची रोकड पकडली आहे. निवडणूक भरारी पथकाने ही 40 लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली असून चौकशी सुरू आहे.  शहरातील सूतगिरणी चौकामधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

भिवंडीत 2.30 कोटी रुपयांची रक्कम जप्त

भिवंडी (Bhiwandi) पूर्व विधानसभा मतदारसंघात नारपोली पोलिस ठाणे हद्दीत पोलिस पथक धामणकर नाका उड्डाण पूलाखाली वाहनांची तपासणी करीत होते. या दरम्यान बँक एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या CMS कंपनीच्या वाहनाची तपासणी केली. व्हॅनमधील रोख रक्कमेबाबत व्हॅनमधील कर्मचारी कोणताही कागदोपत्री तपशील अथवा पैशांचे विवरण पुरावे देऊ शकले नाहीत. त्यामुळे, पोलिसांनी (Police) या रकमेबाबत भरारी पथकाला माहिती दिली होती, त्यानंतर ही 2 कोटी 30 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.  

हेही वाचा

मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
नारळाला होळीत अर्पण का करतात?
नारळाला होळीत अर्पण का करतात?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवालTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : 13 March 2025 : ABP MajhaNagpur Teachers On School : एप्रिल अखेरपर्यंत चालणाऱ्या परीक्षांना शिक्षक समितीचा विरोधParinay Fuke:विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार, फुकेंनी सादर केली ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
नारळाला होळीत अर्पण का करतात?
नारळाला होळीत अर्पण का करतात?
Pakistan train hijack Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Krushna Andhale : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
Reliance Share : 37 वर्षांपूर्वीचे रिलायन्सचे शेअर सापडले, 300 रुपयांच्या 30 शेअरचे बनले 11 लाख, आता तरुणानं घेतला मोठा निर्णय
साफसफाईत रिलायन्सचे 30 शेअर सापडले, दिवसभर चर्चा, 300 रुपयांचे बनले 11 लाख, तरुणाचा मोठा निर्णय
धक्कादायक, बारावीच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या!
धक्कादायक, बारावीच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या!
Embed widget