यापैकीच एक म्हणजे होळीत नारळ टाकण्याची प्रथा.
होळी हा सण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतात.
या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात.
होळीच्या दिवशी होलिका दहन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला रंगांची उधळण करुन होळी खेळली जाते.
होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे.
होलिका दहनाच्या दिवशी आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे.
नारळाला होळीच्या अग्नीत समर्पित केल्यास व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ आशीर्वाद प्राप्त होतात.
होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते अशी सुद्धा मान्यता आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.