तुम्ही घेतलेला आंबा खरा देवगड हापूसच आहे का? या टेक्नॉलॉजीच्या मदतीने क्षणार्धात ओळखता येणार, वाचा सविस्तर
देवगडचा हापूसला जगभरात सर्वोत्कृष्ट आंब्याचा दर्जा दिला जातो .आंब्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवगडच्या हापूसला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भौगोलिक मानांकनाचा दर्जाही आहे .

Devgad Alphanso: देवगड हापूसची रसाळ चव चाखण्यासाठी आंबा प्रेमींची आतुरता शिगेला पोहोचली आहे .बाजारपेठेत आता आंबे येऊ लागले आहेत .नुकतेच साताऱ्यातील देवगड हापूसच्या पहिल्या मानाच्या पेटीला 20 हजारांची बोली लागली . पातळ सालीचा आणि आत भरपूर गर असणारा देवगड हापूस जाणकाराला नुसत्या सुवासाने ओळखता येतो .मात्र देवगड हापूस खरेदी करताना अनेकदा हा आंबा नक्की देवगडचा हापूसच आहे का ? की त्या नावाखाली दुसराच हापूस दिलाय ? हे न ओळखता आल्याने अनेकांची फसवणूक होते . मात्र आता ही फसवणूक रोखण्यासाठी आता एका टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय . या टेक्नॉलॉजीने नागरिकांना खरा देवगड हापूस ओळखणे सोपे होणार आहे .
देवगडचा हापूसला जगभरात सर्वोत्कृष्ट आंब्याचा दर्जा दिला जातो .आंब्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवगडच्या हापूसला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भौगोलिक मानांकनाचा दर्जाही आहे .या टेक्नॉलॉजीने आंब्यावर लावल्या गेलेल्या TP seal UID कोड वरून खरा देवगड हापूस ओळखता येणार आहे .विशेष म्हणजे जीआय नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे .
TP Seal UID टेक्नॉलॉजी नक्की काय ?
देवगड तालुक्यातील आंबा उत्पादक सहकारी संस्थेने भौगोलिक मानांकन नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार TP Seal UID या तंत्रज्ञानात चे वितरण केले आहे .यात शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा UID स्टिकर लावणे बंधनकारक असेल .
प्रत्येक स्टिकर दोन भागात विभागलेला असून एक स्वतंत्र यूआयडी असतो .त्या कोडचा एक भाग स्टिकरच्या वरती आणि दुसरा भाग स्टिकरच्या खाली असतो .
खरा देवगड हापूस कसा ओळखायचा ?
या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण खरेदी करत असलेला आंबा देवगड हापूसच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांनी + 9167 668 899 या क्रमांकावर व्हाट्सअप च्या माध्यमातून फोटो पाठवायचा आहे .
ही सिस्टीम त्या स्टिकर वरील कोड वाचते आणि स्टिकर च्या मागील नंबर लिहून पाठवण्यास सांगते .
नंबर वाचण्यासाठी स्टिकर काढले असता त्याचे आपोआप दोन भाग होतात .
जर व्हाट्सअप द्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टीम मधील UIDशी जुळला तर ग्राहकास शेतकरी /विक्रेत्याचे नाव ,मुळगाव , GI नोंदणी क्रमांक असा तपशील पाठवला जातो .
या तपशिला वरून पडताळणी केली असता देवगड हापूस बाबतची विश्वसनीयता वाढेल असे सांगण्यात येत आहे .
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

