शेंदूर लावायला वाकलेल्या मुलाला विहिरीत ढकलले, नरबळीच्या प्रयत्नाने महाराष्ट्र हादरला
Wardha Crime News : वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न (superstition and black magic) केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
Wardha Crime News : वर्ध्यात महिलेकडून 12 वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न (superstition and black magic) केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. वर्ध्यातील नालवाडी परिसरात शेजारी राहणाऱ्या महिलेने एका बारा वर्षीय बालकाला विहिरीत ढकलल्याची (Crime News) घटना घडली आहे. विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव केलाय. या प्रकरणी वर्धा पोलिसांनी (Wardha Police) जादूटोणा विरोधी कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
मुलाचं नशीब बलवत्तर म्हणून वाचला -
नालवाडीच्या नागसेन नगर येथे राहणाऱ्या शारदा राजू वरके हिने शेजारी खेळत असलेल्या बारा वर्षीय बालकाला बोलावून विहिरीजवळ नेले. बालक परिसरात पतंग उडवत होता, काहीतरी काम आहे असा बहाणा करीत मुलाला सोबत नेले. विहिरीजवळ पोहचल्यावर विहिरीला शेंदूर लावायला सांगितले. वाकलेल्या बालकाला लगेच विहिरीत ढकलले. मुलगा विहिरीत असलेल्या दोरीच्या सहाय्याने कसाबसा चढत वर आला आणि आपले प्राण वाचवीले. घरी पोहचलेल्या बालकाने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितल. आईच्या तक्रारीवरून आरोपी शारदा राजू वरके हिच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून नरबळी व इतर अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधश्रद्धेला खतपाणी येते कुठून ?
वर्ध्याच्या नागसेन नगर येथे घडलेल्या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांना मिळाली, नेमका काय प्रकार घडला याची सखोल माहिती घेण्यात आली. गजानन सुरकार यांनी त्या विहिरीवर जाऊन पाहणी केली असून घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती घेतली आहे. 12 वर्षीय चिमुकल्याला विहिरीवर नेऊन शेंदुर लावून पूजा करण्यात आली असून त्याला विहिरीत ढकलण्यात आले होते. समाजात अंधश्रद्धा थांबावी म्हणून वेळोवेळी जनजागृती केली जाते. अंधश्रद्धेचा बळी जाऊ नये म्हणून कठोर कायदे देखील करण्यात आले. मात्र अंधश्रद्धेला खतपाणी येते कुठून असा सवाल उपस्थित होत आहे.
महिलेविरोधात गुन्हा दाखल -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित मुलगा हा वर्ध्यात आपल्या आजी -आजोबाकडे शिकायला आहे. तो बाहेरून घरी परतल्यावर त्याचे कपडे भिजलेले होते. घाबरलेल्या अवस्थेत घरी परतलेल्या पीडित बालकाची कुटुंबीयांनी विचारणा केली. विचारणा केल्यावर घडलेला प्रकार सांगितला. वर्धा पोलिसांनी अपराध क्रमांक 363,307, भादवी सहकलम 3 महाराष्ट्र नरबळी इतर अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शारदा हिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तपास तात्काळ सुरु केला आहे.
आणखी वाचा :
Crime : मारहाण केली, विष पाजलं, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, विद्यार्थ्याने कोर्टात धाव घेतली
दुबईतून नवऱ्याकडून सुपारी, भारतात चुलतभावाने विडा उचलला, वहिनीवर आधी अत्याचार मग जीव घेतला!