दुबईतून नवऱ्याकडून सुपारी, भारतात चुलतभावाने विडा उचलला, वहिनीवर आधी अत्याचार मग जीव घेतला!
UP Fatehpur Crime News : उत्तरप्रदेशमधून (uttar Pradesh) मन सुन्न करणारी घटना घडली आहे. फतेहपूर (UP Fatehpur) येथे चार जणांनी एका महिलेवर अत्याचार करुन खून केलाय. या प्रकरणामध्ये त्या महिलेच्या नवऱ्याचा आणि दिराचा समावेश (Crime News) असल्याचं पोलिसांच्या तपासात (police) उघड झालेय.
![दुबईतून नवऱ्याकडून सुपारी, भारतात चुलतभावाने विडा उचलला, वहिनीवर आधी अत्याचार मग जीव घेतला! fatehpur Crime News husband gave contract for murder of wife from dubai to cousin four arrested दुबईतून नवऱ्याकडून सुपारी, भारतात चुलतभावाने विडा उचलला, वहिनीवर आधी अत्याचार मग जीव घेतला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/23/388ef90afdba24f31a3ba249697141771705991294926856_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
UP Fatehpur Crime News : उत्तरप्रदेशमधून (uttar Pradesh) मन सुन्न करणारी घटना घडली आहे. फतेहपूर (UP Fatehpur) येथे चार जणांनी एका महिलेवर अत्याचार करुन खून केलाय. या प्रकरणामध्ये त्या महिलेच्या नवऱ्याचा आणि दिराचा समावेश (Crime News) असल्याचं पोलिसांच्या तपासात (police) उघड झालेय. नवऱ्याने दुबईतून पत्नीच्या हत्येची सुपारी चुलत भावाला दिली होती, असेही तपासात उघड झालेय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईत बसलेल्या नवऱ्याने चुलत भावाला आपल्या पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती. 20 जानेवारी रोजी सकाळी ललौली पोलिस स्टेशन परिसरात आबू मोहम्मदपुर गावात एका घरात महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहावर कपडे नव्हते, त्याशिवाय दुखापतीच्या खूना होत्या. महिलेच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात असे समोर आलेय की, महिलेचा पती छोटू लोधी दुबईत काम करत होता. दुबाईतून त्याने चुलत भाऊ ननकू लोधी उर्फ सूरज याला पत्नीच्या हत्येची सुपारी दिली.
दुबईतून नवऱ्याने दिली पत्नीच्या हत्येची सुपारी -
पत्नीच्या हत्येसाठी दुबईतून छोटू लोधी याने चुलत भावाला सुपारी दिली होती. यासाठी एक लाख रुपयांचा सौदा झाला. त्याने एक लाख रुपये ननकू लोधी याला मिळणार होते, तर दोन लाख रुपये हत्या करणाऱ्या आरोपींना देण्यात येणार होते. दीर ननकू याने या कटामध्ये मित्रांना सामील केले. हत्या करण्याआधी आरोपींनी अत्याचार केले.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ननकू लोधी याने कुटुंबातील रोहित लोधी, रामचंद्र उर्फ पुत्तू, शिवम उर्फ पंचम, सोनू लोधी यांना सोबत घेत खून केला. हत्या करण्याआधी त्यांनी दारु प्याली. त्यानंतर महिलेला घरात घेऊन गेले.
चार आरोपींना अटक, दीर फरार
ननकू लोधी याच्यासह पाच जणांनी त्या महिलेवर सामुहिक अत्याचार केले. त्यानंतर गळा आवळून तिचा जीव घेतला. आरोपी महिलेच्या डोक्यात दगडाने मारहाण करण्यात आली. हत्या केल्यानंतर महिलेचा मृतदेहाला तिथेच टाकून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पाच पथके नेमण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवत चार आरोपींना बेड्या ठोकल्या. मुख्य आरोपी ननकू लोधी अद्याप फरार आहे. पोलिसांनी महिलेचा मोबाईल आणि दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. फरार ननकू लोधी याचा पोलिस ठिकठिकाणी शोध घेत आहेत.
आणखी वाचा :
Crime : मारहाण केली, विष पाजलं, पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, विद्यार्थ्याने कोर्टात धाव घेतली
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)