एक्स्प्लोर

Buldhana News : कृषी विभागाच्या कारवाईने दणाणले कृषी केंद्र चालकांचे धाबे; 207 कृषी केंद्रांवर निर्बंध, 65 चे परवाने रद्द तर चार निलंबित

Buldhana News : नियमानुसार जे कृषी केंद्र खते आणि  बियांण्याची विक्री करीत नसतील, अशावर कारवाई करण्याचे काम बुलढाणा कृषी विभागाने सुरू केले असून जिल्ह्यातील 65 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.

Buldhana News बुलढाणा : खरीपाच्या पेरण्या तोंडावर बियाणे आणि खतांचा काळाबाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. मागील वर्षी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांमध्ये बोगस खते विक्रीचे (Prohibited Seeds) अनेक प्रकार आढळले होते. काही ठिकाणी सक्तीही केल्या जात होती. यावर्षी असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कृषी विभागाने तत्पर पावले उचलले आहेत. नियमानुसार जे कृषी केंद्र खते आणि  बियांण्याची विक्री करीत नसतील, अशावर कारवाई करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले असून जिल्ह्यातील 65 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर चार कृषी केंद्रांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. तर त्यातील  207 कृषी केंद्रवर खते बियाण्यांच्या विक्रीस बंदी घातली आहे. या कारवाईने कृषी केंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

207 कृषी केंद्रांवर निर्बंध, 65 चे परवाने रद्द तर चार निलंबित

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. अशातच राज्यात बोगस बियाणांचा (Prohibited Seeds) सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतांना खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा इत्यादि जिल्ह्यात बियाणांचा काळाबाजार सुरूच असल्याचे चित्र आहे.

अशातच आता प्रशासन या प्रकरणामुळे सतर्क होऊन कारवाईचा बडगा उगारत असताना दिसत आहे. अशीच एक धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागाने केली आहे. यात जिल्ह्यातील 65 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर चार कृषी केंद्रांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. तर त्यातील 207 कृषी केंद्रवर खते बियाण्यांच्या विक्रीस बंदी घातली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

कापशी बियाणांच्या विक्रेत्यांकडून काळाबाजार

खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतकरी वर्गाकडून बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. परंतु बहुतांश कृषी केंद्रांतून मागणी असलेले कपाशी वाण तुटवड्याचे कारण दाखवून जादा भावाने विकले जात आहे. या प्रकाराकडे कृषी अधिकाऱ्यांची डोळझाक पणाची भूमिका घेत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामागील कारण म्हणजे, 864 रुपयांची बैंग 1300 ते 1500 हजारांपर्यंत गेली असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांना बिल मात्र 864 रुपयांचे दिले जात असल्याचे चित्र आहे.

कपाशीचे तुलसी कंपनीचे कबड्डी, पंगा, अजित 155, अजित 05, ऍग्रिसिड 7076, राशी सिड्स 659, राशी सिड्स 779, स्विफ्ट, प्रवर्धन सीडलेस एक्स, प्रवर्धन रेवंत या सर्व बियाणांची कृत्रिम तुटवडा भासविण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून, शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरीवर्गातून केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Nasrapur Case: चिमुरडीच्या अंगावर टणक हत्यारामुळे जखमा, पोस्टमार्टम रिपोर्टमधील माहिती, नसरापूरच्या नराधमाकडील गाठोड्याने गूढ वाढवलं
चिमुरडीच्या अंगावर टणक हत्यारामुळे जखमा, पोस्टमार्टम रिपोर्टमधील माहिती, नसरापूरच्या नराधमाकडील गाठोड्याने गूढ वाढवलं
Nagpur Kinnar Controversy: नागपुरात कथित पीठाधीश्वर पदावरून किन्नरांमध्ये तणाव; गंभीर गुन्ह्यातील उत्तम बाबाला पीठाधीश्वराच्या गादीवर बसवण्यावरून वाद, नेमकं प्रकरण काय?
नागपुरात कथित पीठाधीश्वर पदावरून किन्नरांमध्ये तणाव; गंभीर गुन्ह्यातील उत्तम बाबाला पीठाधीश्वराच्या गादीवर बसवण्यावरून वाद, नेमकं प्रकरण काय?
Pune Crime News: भाऊ वहिनी नसताना तो घरात शिरला, तिच्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं, प्रेमसंबंध अन् वादातून प्रियकराचं प्रेयसीसोबत क्रूर कृत्य
भाऊ वहिनी नसताना तो घरात शिरला, तिच्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं, प्रेमसंबंध अन् वादातून प्रियकराचं प्रेयसीसोबत क्रूर कृत्य
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Embed widget