Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
अलिबाग-पेण मार्गावर असणाऱ्या तिनविरा परीसरात दरोडा टाकून 7 किलो सोने लुटण्यात आले. ही घटना काल 9 फेब्रुवारीला घडली असून या दरोड्यात चक्क पोलिसांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Raigad Crime News : अलिबाग-पेण मार्गावर असणाऱ्या तिनविरा परीसरात दरोडा टाकून 7 किलो सोने लुटण्यात आले. ही घटना काल 9 फेब्रुवारीला घडली असून या दरोड्यात चक्क पोलिसांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. या दरोडेखोराकडून आतापर्यंत पोलीसांनी 1 कोटी 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिस तपासानंतर सापडलेल्या दरोडेखोरांमध्ये आश्चर्यची बाब म्हणजे या पाच आरोपींमध्ये 3 जण हे रायगड पोलीस दलातीलच पोलीस कर्मचारी असून उर्वरित 2 आरोपी हे अलिबाग मधील असल्याची माहिती मिळाली आहे.
1 कोटी 50 लाख रुपयांची रोकड जप्त
दरम्यान, तब्बल सात किलो वजनाचे सोने घेऊन या दरोडेखोरांनी नागपूरच्या एका सराईत व्यापाऱ्याला हे सोने अवघ्या दीड कोटी रुपयांमध्ये विकण्याचा घाट आखला होता. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना पकडण्यात यश मिळवले आहे. यामध्ये चौघा आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून उर्वरीत एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र या कटात पोलिसांचा सहभाग असल्याने कुंपणानेच शेत खाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
पकडण्यात आलेले पोलिस दलातील दरोडेखोर आणि अन्य आरोपी
1)पोलीस हवलदार समीर म्हात्रे (मुरूड पो ठाणे)⁷
2)पोलीस हवलदारविकी साबळे (अलिबाग)
3)पोलीस हवलदार हनुमंत सूर्यवंशी (फरार) . (अलिबाग)
4) समाधान पिंजारी (मुख्य आरोपी अटक)
5) दीप गायकवाड (आरोपी अटक)
कोट्यावधीच्या ड्रग्स विरोधातील कारवाईत तीन सहआरोपींना अटक
बोईसरच्या काटकर पाडा येथे मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने कोट्यावधी रुपये किमतीच्या ड्रग्स विरोधात केलेल्या कारवाईत आता मोठी माहिती समोर आली आहे . या प्रकरणात पालघर पोलिसांनी तीन सहआरोपींना अटक केली असून हे चारही आरोपी 25 ते 30 वयोगटातील आहेत. तसच यापैकी बोईसर काटकर पाडा कलर सिटी येथे राहणारा मुख्य आरोपी अमान मुराद (29) हा केमिकलचा पदवीधर विद्यार्थी असून त्याने यापूर्वी अनेक कंपन्यांमध्ये काम केलं असल्याची माहिती समोर आली आहे.
अमीन हा मिरा रोड सह परिसरातून ड्रग्स आणून त्याच्यावर प्रक्रिया करून त्यापासून एमडी ड्रग्स तयार करत होता . यात त्याला कलीम खान वय वर्ष 24 अमन सय्यद वय वर्ष 25 आणि सनी सिंग वय वर्ष 29 हे मदत करत असल्याची माहिती पालघर पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
