Bhiwandi Crime News: पोलीस असल्याची बतावणी करत अनेकांना गंडवलं; अखेर सराईत गुन्हेगारास पोलिसांनी गाठलं, लाखोंच्या दागिन्यांसह अटक!
Bhiwandi Crime News: निजामपूरा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

भिवंडी: निजामपूरा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यातील आरोपीकडून 9 लाख 28 हजार रुपये किमतीचे 116 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 मे 2024 रोजी एका नागरिकाला थांबवत यातील भामट्याने स्वतःला क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगितले. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिक गळ्यात किती दागिने घालतात, याचा सर्वे सुरू असल्याचे सांगून त्याला गळ्यातील सोन्याची चैन खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तोतया अधिकाऱ्याने नागरिकाला एक कागद देऊन त्यात चैन ठेवण्यास सांगितले. मात्र, हातचलाखीने सोन्याची चैन लंपास करून आरोपी पसार झाला. या प्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लाखोंच्या दागिन्यांसह आरोपीस अटक!
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखा घटक - 2 भिवंडीच्या पथकाने वासींद येथे राहणाऱ्या जब्बार अजीज जाफरी यास शिताफीने अटक केली. कौशल्यपूर्ण तपासादरम्यान आरोपीने यापूर्वी निजामपूरा, नारपोली, भोईवाडा, भिवंडी शहर, विठ्ठलवाडी आणि कळवा पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचे सहा गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या सराईत गुन्हेगारास अटक करून, त्याच्याकडून 9 लाख 28 हजार रुपये किमतीचे 116 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
धावत्या एसटीत हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास, 2018च्या हत्येचा लागला निकाल
धावत्या एसटीत मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीये. खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस पी पोळ यांनी ही शिक्षा सुनावली. अजित कान्हूरकर असं आरोपीचं नाव आहे. मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून पुण्याच्या खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 12 जून 2018 ला घडलेल्या हत्येचा तब्बल साडे सहा वर्षानंतर निकाल लागलाय.
अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते, त्यामुळं मामाचा अन मुलीचा ही लग्नास नकार होता. या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितने ठरवलं. याची सुरुवात मामाचा 18 वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसे पासून त्याने केली. श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी एसटीतून खेडच्या दिशेने निघाले. त्यावेळी मागच्या सीट वर बसलेल्या अजितने धारदार शस्त्राने सपासप वार केले. अटकेनंतर ही अजित तुरुंगातून पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता, इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोर ही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहता आरोपी तुरुंगाबाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता अजितला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील म्हणून सागर कोठारी यांनी कामकाज पाहिलं.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
