बीड: जनावराच्या हल्ल्यात 'त्या' चिमुकल्याचा मृत्यू नाही? पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल
Crime News : बीडमधील पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले असल्याची चर्चा सुरू आहे. जनावराच्या हल्ल्यात हा बालक जखमी झाला होता असे म्हटले जात होते.
Crime News: बीडच्या धारूर मध्ये एका पाच वर्षाच्या मुलाचा अज्ञात जनावराच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. आता मात्र या प्रकरणाने वेगळेच वळण लागले आहे. या चिमुकल्या मुलाचा मृत्यू हा जनावराच्या हल्ल्यात झाला नसून त्याची हत्या झाली असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
धारूर तालुक्यात सोनीमोहा येथील पाच वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे हा बालक शेतात जखमी अवस्थेत आढळला होता. अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रविवारी रात्री बालकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथील शेतात दत्तात्रय दराडे हा पाच वर्षीय बालक नदी पात्रालगत झुडपात जखमी अवस्थेत आढळून आला होता. बालकाचा गळा तेसेच चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. कुटुंबीयांनी जखमी अवस्थेत असलेल्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बालकाचे आजोबा आश्रूबा रामभाऊ दराडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मंगळवारी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Sindhutai Sapkal : 'नकुशी' असणारी चिंधी ते अनाथांच्या आयुष्याचं सोनं करणारी माय; असा होता सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास
- कुछ तुफानी करते है! फक्त थ्रील म्हणून चोरी करणाऱ्या नागपुरातील 'बबली'ला पडल्या बेड्या
- कोरोनाची लागण होताच पालकांनी बाधित मुलांना घेऊन काढला पळ, भिवंडीच्या चिंबीपाडा आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha