Latur Crime News : सिटी बसच्या चालक-वाहकाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; लातूरमधील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
Latur Crime News : या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या प्रकरणात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latur Crime News : लातूर शहरातील सिटी बस चालक आणि वाहकाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या मारहाणीचा व्हिडिओ (VIdeo) देखील समोर आला आहे. या प्रकरणात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरमध्ये एका सिटी बस चालक आणि वाहकाला बेदम लाठ्या-काठ्यानी मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून एक गटाकडून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारहाणीच्या विडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल...
लातूरच्या गंगापूर गावात सिटी बस चालक आणि वाहक यांना काही तरुणांनी बेदम लाठ्या-काठ्यानी मारहाण केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. गंगापूरच्या भर चौकात चालक आणि वाहकाला लाठ्या-काठ्यानी फ्रीस्टाइल बेदम मारहाण झाल्याने, गंगापूर गावात काही काळ भीतीच वातावरण निर्माण झाल होते. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Latur Crime News : सिटी बसच्या चालक-वाहकाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; लातूरमधील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/6a8ZslDdi5
— ABP माझा (@abpmajhatv) February 7, 2024
एकाला लोखंडी रॉडने मारहाण...
दुसऱ्या आणखी एका घटनेत दोघांनी संगनमत करून एकाला लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना समोर सली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप मच्छिंद्र उंप (रा. नवरत्न नगर, साई रोड, लातूर) यांना पवन चव्हाण व सोबतच्या एकाने संगनमत करून शिवीगाळ करून तू माझ्या पुतण्यास क्रिकेट खेळत असताना मारहाण का केलास असे म्हणून लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादीची आई सोडवासोडवी करीत असताना त्यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच भाजीपाला व तराजूची तोडफोड करून जवळपास सात हजार रुपयांचे नुकसान करून तुम्हाला खल्लास करतो म्हणून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या