Jalna Crime News: जुन्या वाद विकोपाला, चक्क लोखंडी रॉड ने चटके देऊन मारहाण; ठाकरे गटाच्या तालुका अध्यक्षासह एकावर गुन्हा दाखल
Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या अन्वा या गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात दोन आरोपीकडून एका व्यक्तीस लोखंडी रॉडने चटके देऊन मारहाण केल्याची घटना समोर आलीय.

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या अन्वा या गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात दोन आरोपीकडून एका व्यक्तीस लोखंडी रॉडने चटके देऊन मारहाण केल्याची घटना समोर आलीय. कैलास बोराडे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, जुन्या वादातून आरोपीने ही मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे. बोराडे हे एका मंदिरात दर्शनासाठी गेले असता जुन्या वादातून आरोपी सोबत बाचाबाची झाली. अशातच हा वाद विकोपाला जाऊन किरकोळ मारहाण आणि त्यानंतर जवळच असलेल्या एका पेटत्या चुलीत रॉड टाकून आरोपींने चक्क चटके दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये हा घटनाक्रम नमूद करण्यात आला असून या प्रकरणी उबाठाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याच्या भावा विरोधात पारध पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत असून या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एसटीची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू; सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील घटना
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दोड्डी फाट्याजवळ एसटी दुचाकीला धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. तर बसमधील काही प्रवासीही जखमी झाले आहेत. प्रदीप सोमवंशी या दुचाकी चालकाचा यात मृत्यू झाला. तर सतीश सोमवंशी हा जखमी झाला आहे. हैदराबाद रोडवरून सोलापूरकडे एसटी बस येत होती. एसटीमध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी होते. हैदराबाद-सोलापूर महामार्गावरील दोड्डी फाट्याजवळ समोर जाणाऱ्या दुचाकीला एसटीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेत बसमधील प्रवासी ही जखमी झाले आहेत.
धाराशिवमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव? एक संशयित रुग्ण, प्रशासन अलर्टमोडवर
धाराशिवमध्ये बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्याच्या ढोकी येथील मांस विक्री करणाऱ्या व्यक्तीला या आजारासंदर्भात काही लक्षणे आढळून आले आहेट. यात तापाने फणफणलेल्या व्यक्तीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णाचा तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला आहे. दरम्यान, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरालॉजी प्रयोगशाळेकडे हे स्वॅब तपासणीसाठी पाठवल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. धाराशिवमधील ढोकी येथे कावळ्याच्या माध्यमातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी गावापासून दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित केलाय. या प्रकरणामुळे पशुसंवर्धन आणि आरोग्य विभाग ही अलर्ट मोडवर आले असून ढोकीयेथील चिकन विक्रीचे दुकान बंद ठेवण्यात आले आहे. तसेच परिसरातील कुकुट पक्षाचे सर्वेक्षण ही सुरू करण्यात आले आहे. कावळे आणि कोंबड्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला लक्षने आढळल्यास तपासणी केली जाणार असल्याची माहिती ही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

